Tarun Bharat

गोकुळच्या गाय दूध खरेदी दरात वाढ?

Advertisements

वारणा दूध संघाकडून 1 रुपयांची वाढ : आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीकडे लक्ष

प्रतिनिधी/कोल्हापूर

वारणा दूध संघाने गाय दूध खरेदी दरात एक रुपयांची दरवाढ जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाची दरवाढी संदर्भात काय भुमिका असणार हे आज होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्पष्ट होणार आहे. गाय दूध संकलनासाठी स्पर्धा वाढल्याने गोकुळही खरेदी दरात वाढ करणार का, याकडे जिल्ह्य़ातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्ह्य़ात गाय दूध संकलनासाठी परजिल्हा, राज्यातील दूध संघांनी एंट्री केली आहे. जिल्ह्य़ातील दूध संघापेक्षा ज्यादा दर देवून या दूध संघांकडून संकलन सुरु आहे. सध्या गोकुळकडून शेतकऱ्यांना प्रतिलिटर 29 रुपये, वारणेकडून प्रतिलिटर 30 रुपये दर दिला जात आहे. तर परजिल्हा व राज्यातील सुमुल, हॅटसन, नेचर डिलाइट, पंचामहल, शामाई, गोदरेज, थोटे डेअरी या दूध संघांकडून 35 ते 36 रुपये दराने शेतकऱ्यांकडून दूध खरेदी केले जात आहे. प्रतिलिटर पाच ते सहा रुपये जादा मिळत असल्याने शेतकरीही या दूध संघांकडे आकर्षित होत आहेत. तर गोकुळनेही 1 एप्रिल रोजीपासून शेतकऱ्यांना दोन रुपये दरवाढ दिली आहे. त्यामुळे या स्पर्धेत गोकुळची गाय दूध खरेदी दरात संदर्भात काय भुमिका असणार हे शुक्रवार 29 रोजी होत असलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्पष्ट होणार आहे.

Related Stories

सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृती पर्वकाळातील कार्यक्रम रद्द

Archana Banage

त्यांनी रेल्वे स्टेशनवर अनुभवली माणुसकी

Archana Banage

प्रा .जयंत आसगावकरांनी उत्कृष्ठ कामगिरी करत शिक्षक आमदार म्हणून इतिहास घडावावा – पालकमंत्री

Archana Banage

महावितरणच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यास मारहाण

Archana Banage

हद्दवाढ समर्थक व विरोधक एकत्र येणार

Archana Banage

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे तीन बळी, 177 पॉझिटिव्ह

Archana Banage
error: Content is protected !!