Tarun Bharat

सोने 27 महिन्यांच्या उच्चांकावर

गेल्या दोन दिवसात 860 रुपयांनी वाढ

नवी दिल्ली ः

सोनेदराला पुन्हा एकदा झळाळी मिळाली असून हा दर प्रतितोळा 53,600 रुपयांवर पोहोचला आहे. मुंबईत शुक्रवारी सोनेदर प्रतितोळा 53,730 रुपयांपर्यंत वाढला होता. हा दर गेल्या 27 महिन्यांतील उच्चांकावर गेला आहे. यापूर्वी 18 ऑगस्ट 2020 रोजी सोन्याचा भाव 53,815 रुपयांवर गेला होता. 2021 मध्ये तो 53 हजारांच्या पातळीला कधीही स्पर्श करू शकला नाही. किंबहुना डॉलरच्या घसरणीमुळे जगभरात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेतही दिसून येत आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) नुसार, शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याची किंमत 53,611 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. अवघ्या दोन दिवसात सोने 860 रुपयांनी तर गेल्या दहा दिवसात 1,261 रुपयांनी महागले आहे. 23 नोव्हेंबर रोजी सोन्याचा दर 52,350 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

Related Stories

शेतकरी, स्थलांतरितांना दिलासा

Patil_p

कोरोनाचा फटका : 22 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद

tarunbharat

म्यानमार सीमेवर दहशतवादी हल्ला; कमांडिंग ऑफिसरसह 7 जणांचा मृत्यू

datta jadhav

शोपियां चकमकीत दहशतवाद्याला कंठस्नान

datta jadhav

जेएनयू हल्ला : तरुण आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जात आहे : सोनिया गांधी

prashant_c

नाहिद हसनला अटक, बहिण उमेदवारीच्या शर्यतीत

Amit Kulkarni