Tarun Bharat

लवलिना, निखत झरीन यांना सुवर्णपदक

वृत्तसस्था/ भोपाळ

भारताच्या महिला मुष्टीयोद्धय़ा लवलिना बोर्गोहेन आणि निखत झरीन यांची येथे झालेल्या सहाव्या इलाईट महिलांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत आपल्या वजन गटातून सुवर्णपदके मिळवली. या स्पर्धेमध्ये रेल्वे क्रीडा मंडळाने सांघिक जेतेपद मिळवताना 10 पदकांची कमाई केली.

आसामची लवलिना हिने 75 किलो वजनगटातील अंतिम सामन्यात सेनादलाच्या अरुंधती चौधरीचा 5-0 असा गुणांनी एकतर्फी फडशा पाडत सुवर्णपदक घेतले. 50 किलो गटातील अंतिम लढतीत निखत झरीनने अनामिकाचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत या गटातील जेतेपद आणि सुवर्णपदक स्वतःकडे राखले. केंद्रीय क्रीडा युवजन खात्याचे मंत्री अनुराग सिंग ठाकुर यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पदके प्रदान करण्यात आली. 48 किलो वजन गटातील अंतिम लढतीत मंजू राणीने तामिळनाडूच्या एस. केलवेनीवर 5-0 अशी मात करत सुवर्णपदक मिळवले. सदर स्पर्धेत 54 किलो गटात शिक्षा, 60 किलो गटात पूनम, 63 किलो गटात शशी चोप्रा, 81 किलोवरील गटात नुपूर यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. रेल्वेच्या स्पर्धकांनी या स्पर्धेत 5 सुवर्ण, तीन रौप्य आणि 2 कास्य पदकांसह सांघिक विजेतेपद आपल्या संघाला मिळवून दिले. मध्यप्रदेशने 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 5 कास्य पदकांसह दुसरे स्थान तर हरियाणाने 2 सुवर्ण आणि 2 कास्य पदकांसह तिसरे स्थान मिळवले. मणिपूरच्या सनामाच्या चानूने 70 किलो वजन गटात मध्यप्रदेशच्या श्रुती यादवचा 3-2 असा पराभव करत सुवर्णपदक घेतले. हरियाणाच्या मनिषाने 57 किलो गटात, स्वातीने 81 किलो गटात, साक्षीने 52 किलो गटात तर मध्यप्रदेशच्या मंजू बांबोरियाने 66 किलो गटात सुवर्णपदके मिळवली.

Related Stories

विंडीजविरुद्ध मालिकेसाठी रोहित शर्मा ‘सज्ज’

Patil_p

पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी आजपासून

Patil_p

सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल

Archana Banage

लंकेवर घोंघावले ‘रॉकस्टार’चे वादळ!

Patil_p

ऑस्ट्रेलियाला हरवून इंग्लंडची विजयी सलामी

Patil_p

INDvsENG अंतिम सामन्यासह भारताचा 3-2 ने मालिका विजय

Archana Banage