Tarun Bharat

हर्षदा गरुडला सुवर्णपदक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ताश्कंद येथे सुरू असलेल्या आशियाई युवा आणि कनिष्ठांच्या पुरुष आणि महिलांच्या वेटलिफ्टींग स्पर्धेत भारताची 18 वर्षीय महिला वेटलिफ्टर हर्षदा गरुडने सुवर्णपदक पटकाविले.

महिलांच्या 45 किलो वजन गटात हर्षदाने स्नॅचमध्ये 69 तर क्लिन आणि जर्कमध्ये 88 किलो असे एकूण 157 किलो उचलत सुवर्णपदक हस्तगत केले. यापूर्वी म्हणजे गेल्या महिन्यात झालेल्या कनिष्ठांच्या विश्व वेटलिफ्टींग स्पर्धेत हर्षदाने 153 किलो वजन उचलले होते. ताश्कंदमधील या स्पर्धेत महिलांच्या 45 किलो वजन गटात भारताच्या सौम्या दळवीने एकूण 145 वजन उचलत कास्यपदक मिळविले. या स्पर्धेत पुरुषांच्या 49 किलो वजन गटात भारताच्या एल. धनुषने 85 किलो वजन स्नॅचमध्ये उचलत कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेमध्ये स्नॅच तसेच क्लिन आणि जर्कमध्ये स्वतंत्र पदके दिली जात आहेत.

Related Stories

बॉक्सर्स, प्रशिक्षकांना मिळणार विमा सुरक्षा कवच

Patil_p

टोकियो ऑलिम्पिकमधून अझारेन्काची माघार

Patil_p

राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धात कोरे इंग्लीस अकॅडमी तृतीय

Archana Banage

अफगाणविरुद्धच्या मालिकेसाठी पाकचे नेतृत्व शादाब खानकडे

Patil_p

एआयएफएफचे निलंबन लवकरच रद्द होणार

Patil_p

भारतीय महिला क्रिकेट संघाचा मोठा पराभव

Patil_p