वृत्तसंस्था/ कोलकाता
शेअर बाजारात लवकरच आणखी एका कंपनीचा आयपीओ दाखल होणार आहे. गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्रि तिचे नाव. फ्लोट ग्लास बनवणारी कंपनी गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्री आपला आयपीओ लवकरच बाजारात दाखल करणार आहे. कंपनीने आयपीओ आणण्याकरिता बाजारातील नियामक सेबीकडे आपला रीतसर अर्ज दाखल केला असल्याचे समजते. सदरच्या अर्जाला मंजुरी मिळताच बाजारात आयपीओ दाखल करण्याची तारीख जाहीर केली जाईल. सदरच्या नव्या आयपीओ अंतर्गत कंपनी 300 कोटी रुपये आगामी काळामध्ये उभारणार असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचे प्रवर्तक आणि सध्याच्या शेअर धारकांकडून 1,28,26,224 इक्विटी समभागांची विक्री ऑफर फॉर सेल अंतर्गत केली जाणार आहे. भारतामध्ये फ्लोट ग्लास बनवणारी ही सर्वात मोठी कंपनी असल्याचे सांगितले जात आहे.