Tarun Bharat

भामटय़ाकडून 20 तोळे सोने लंपास

हुक्केरी येथील घटना : चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

वार्ताहर / हुक्केरी

Advertisements

चोरीच्या घटना वाढत असतानाच हुक्केरी येथील विद्या ज्वेलर्समधील 20 तोळे सोने असणारा डबा भामटय़ाने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने हुक्केरी शहरासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डबा घेऊन पोबारा झालेला भामटा सीसी कॅमेऱयामध्ये कैद झाला असून पोलीस त्याआधारे चोराचा शोध घेत आहेत. या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, रविवार दि. 19 रोजी या भामटय़ाने ज्वेलरीमध्ये प्रवेश केला व त्याने दुकानात असलेल्या मालकांना तुझ्या भावाने जो डबा ठेवला आहे तो मला दे, असे सांगून दुकानदाराची दिशाभूल करीत 20 तोळे सोने असणारा डबा हातोहात पळविला. या प्रकरणाची माहिती बुधवारी सायंकाळी सोन्याच्या दागिण्याचा मेळ घेत असताना दुकानदाराच्या लक्षात आली. दरम्यान सीसी कॅमेऱयाचे फुटेज पहाताना हा प्रकार आढळून आला. घटनेची  पोलिसात नोंद केली असून सीसी कॅमेऱयाचे फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. चोरींच्या वाढत्या घटनांनी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Patil_p

राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात साकारतोय सफारी मार्ग

Omkar B

गोकाक रुग्णालयात ऑक्सिजन युनिटचे उद्घाटन

Omkar B

सांबरा रोडवर दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या त्रिकुटाला अटक

Rohan_P

सामाजिक बांधिलकी जपणारी वन टच फाउंडेशन संस्था

Patil_p

यंदाही दहावीचा निकाल श्रेणीनिहाय

Omkar B
error: Content is protected !!