प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूर येथील महाराष्ट्र हायस्कूलचा आठवीचा विद्यार्थी राजवीर बिर्जेने कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. शिमोगा येथे कर्नाटक राज्य कराटे संघटना व शिमोगा सिटी कराटे संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये 14 वर्षांखालील वयोगटात कटास या प्रकारात त्याने सुवर्णपदक मिळविले. त्याला कराटे प्रशिक्षक चंदन जोशी व नागराज जोशी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. याचबरोबर त्याचे वडील यल्लाप्पा बिर्जे, मुख्याध्यापक बी. पी. कानशिडे व शिक्षकांचे प्रोत्साहन लाभत आहे.