वृत्तसंस्था/ चेंगवॉन
आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सोमवारी भारताचा 23 वषीय नेमबाज अर्जुन बबुताने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
पंजाबच्या अर्जुन बबुताने 10 मीटर एअर रायफल नेमबाजीच्या अंतिम फेरीत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱया लुकास कोझेनीस्कायचा 17-9 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. 2016 पासून बबुता विविध आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. चेंगवॉनमधील स्पर्धेत अंतिम फेरीपूर्वी झालेल्या पात्रतेच्या फेरीत बबुताने 261.1 गुण नोंदवित आपली पात्रता सिद्ध केली. 2016 साली अझरबैजान येथे झालेल्या कनि÷ांच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत अर्जुन बबुताने पहिले सुवर्णपदक मिळविले होते. या क्रीडाप्रकारात भारताच्या पार्थ मखिजाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.