‘नाटू-नाटू’ने पटकाविला सर्वोत्कृष्ट गीताचा पुरस्कार ः पंतप्रधानांकडून चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन
वृत्तसंस्था/ लॉस एंजिलिस
एस. एस. राजामौली यांचा चित्रपट ‘आरआरआर’ने प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळविला आहे. चित्रपटातील ‘नाटू-नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट गीताच्या शेणीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘आरआरआर’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतही आहे. त्याला ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट गीताच्या शेणीतच नामांकन मिळाले आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळविणाऱया ‘आरआरआर’ चित्रपटातील सर्व कलाकार तसेच सदस्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत अभिनंदन केले आहे.
अमेरिकेच्या बेव्हर्ली हिल्समध्ये सुरू असलेल्या 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार वितरण सोहळय़ात राजामौली हे चित्रपटातील कलाकार राम चरण तेजा तसेच ज्युनियर एनटीआर यांच्यासह उपस्थित झाले होते. संगीत दिग्दर्शक एम. एम. कीरावाणी यांनी गोल्डन ग्लोब पुस्कार स्वीकारला, तसेच राजामौली आणि कलाकारांचे आभार मानताना ते भावुक झाल्याचे दिसून आले. गोल्डन ग्लोबमध्ये ‘आरआरआर’ला सर्वोत्कृष्ट बिगर इंग्रजी भाषिक चित्रपटाच्या शेणीतही नामांकन मिळाले होते. परंतु या शेणीत ‘अर्जेंटिना 1985’ चित्रपटाने बाजी मारली आहे.
गोल्डन ग्लोबमध्ये 1957 मध्ये पहिल्यांदा भारतीय चित्रपटाला नामांकन मिळाले होते. व्ही. शांताराम यांच्या चित्रपटाची निवड झाली होती. आंतरराष्ट्रीय चित्रपट शेणीत चित्रपटाने पुरस्कार मिळविला होता. त्यानंतर 1983 मध्ये रिचर्ड एटनबर्ग यांचा चित्रपट ‘गांधी’ने 5 गोल्डन ग्लोब चित्रपट स्वतःच्या नावावर केले होते. तर 2009 मध्ये संगीत दिग्दर्शक ए. आर. रेहमान यांनी स्लमडॉग मिलेनियरसाठी सर्वोत्कृष्ट गीताच्या शेणीचा पुरस्कार मिळविला होता.
आरआरआर चित्रपटाच्या गीताला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्यावर चित्रपटातील कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच बॉलिवूड अन् दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी त्यांचे अभिनंदन पेले आहे.
गोल्डन ग्लोबचे यंदाचे मानकरी
श्रेणी विजेता
सर्वोत्कृष्ट चित्रपट द बॅनशीज ऑफ इनिशइरीन
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग (द फॅबेलमन्स)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री केट ब्लँचेट (टार)
सर्वोत्कृष्ट अभिनेता ऑस्टिन बटलर (एल्विस)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अँजेला बॅस्सेट (ब्लॅक पँथर)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता के हुये क्वान
सर्वोत्कृष्ट बिगर इंग्रजी चित्रपट अर्जेंटिना, 1985
सर्वोत्कृष्ट गीत नाटू नाटू (आरआरआर)
सर्वोत्कृष्ट सीरिज हाऊस ऑफ ड्रगन