Tarun Bharat

आरटीओ कार्यालयाची सुवर्ण वाटचाल…

Advertisements

कार्यालय इमारतीचा इतिहास रंजक : अधिकाऱयांचा जीव जुन्या इमारतीत गुंतून : नवीन इमारतीसाठी हालचाली गतिमान : यमनापूर येथे स्थलांतर होणार

दीपक बुवा /बेळगाव

इतिहासाची पाने चाळताना त्या त्या काळातील परिस्थितीची माहिती मिळते. प्रत्येकालाही असेच औत्सुक्मय असते की आपण राहत असलेल्या किंवा आपल्याला आवडणाऱया शहरात जुन्या काळात केव्हा केव्हा काय काय झाले असेल? तशी माहिती कोठे मिळाली तर मग काळ वेळ याची मर्यादा राहत नाही. काही तरी शोधताना अशी माहिती हाती आली की नजरा खिळतात. ती साठवून ठेवण्याचे प्रयत्न होतात. येथील आरटीओ कार्यालयाबाबतची माहिती ‘तरुण भारत’ला मिळाली आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सुवर्णमहोत्सव साजरा करत असलेला आरटीओ कार्यालयाचा घेतलेला आढावा.

येथील आरटीओ कार्यालय स्वातंत्र्यापूर्वीपासून सुरू आहे. मात्र, सद्य स्थितीतील हे कार्यालय कधी सुरू झाले त्याचे बांधकाम कोणी केले? याचबरोबर त्यावेळी कोण आरटीओ म्हणून कार्यरत होते? याची माहिती आपल्या हाती लागली आहे.

म्हैसूर राज्यात असताना येथील आरटीओ कार्यालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली. त्यावेळी मोहम्मद अली राज्याचे वाहतूक मंत्री होते.  6 जानेवारी 1969 रोजी येथील इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 3 नोव्हेंबर 1970 रोजी म्हणजे वर्षभरात ही इमारत बांधून पूर्ण करण्यात आली.

ब्रिटिश अधिकाऱयाकडून प्रथम पद्भार

या कार्यालयात सर्वप्रथम 1940 साली आरटीओ अधिकारी रुजू झाल्याचे नमूद आहे. इंग्रजांनी बनविलेल्या कायद्यानुसारच याचे कामकाज चालायचे. आताही बहुसंख्य नियम हे इंग्रजांनी तयार केलेल्या कायद्यानुसारच लागू आहेत. येथील आरटीओ कार्यालय इमारतीने 50 वर्षे पूर्ण केली आहेत. आताच्या काँगेस इमारतीजवळ पहिले आरटीओ कार्यालय होते. तेव्हापासून साधारणतः या कार्यालयात आरटीओ म्हणून एका ब्रिटिश अधिकाऱयानेच प्रथम पद्भार स्वीकारला होता.

आता सद्यस्थितीत असणाऱया या कार्यालयाची पुनर्बांधणी करून आहे त्या ठिकाणीच कार्यालयाचे कामकाज 1970 पासून सुरू करण्यात आले. तेव्हापासून या इमारतीतच आरटीओ संबंधीचे कामकाज चालत आले आहे.

नवीन इमारत बांधण्यासाठी धडपड

या आरटीओ कार्यालयाने 50 वर्षे पूर्ण केली आहेत. दरम्यान, आता या कार्यालयाची इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे नवीन इमारत बांधण्याची धडपड अधिकाऱयांकडून सुरू झाली आहे. यासाठी सरकारकडून याला हिरवा कंदील मिळाला नसला तरी हे कार्यालय आता यमनापूर येथील जागेत हलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येथील सर्व कामकाज आता यमनापूर येथे हलविण्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र, या संबंधीचा आदेश अजून न आल्याने सध्या याच इमारतीत कामकाज सुरू आहे.

आरटीओ कार्यालयाचा कारभार अनेकांना त्रासदायक ठरतो किंवा येथील एजंटगिरीमुळे नेहमीच हे कार्यालय चर्चेत असते. येथील अधिकारी कुचकामी आहेत. एजंटशिवाय कामे करत नाहीत, या आणि अशा अनेक तक्रारी नेहमीच नागरिकांतून होत असतात. मात्र, या कार्यालयाच्या इमारतीचा इतिहासही रंजक आहे. 50 वर्षे पूर्ण केलेली आरटीओ इमारत पाडून आता या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी लवकरच सरकारकडून मंजुरी मिळणार आहे. मात्र, अनेक अधिकाऱयांनी त्या ठिकाणी आपली सेवा बजावल्याने त्यांचा जीव जुन्या इमारतीत गुंतून राहिला आहे.

56 हून अधिक अधिकाऱयांची सेवा

बेळगाव येथील आरटीओ कार्यालयात 56 हून अधिक अधिकाऱयांनी सेवा बजावली आहे. इमारतीचे काम सुरू होते तेव्हा जे. आर. राजशेखर हे आरटीओ म्हणून कार्यरत होते. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी आरटीओ म्हणून के. राजाराम सेवारत होते. सध्याचे आरटीओ म्हणून शिवानंद मगदूम कामकाज सांभाळत आहेत. त्यांनी कामात सुसूत्रता आणली आहे.

माझी निवृत्तीही याच इमारतीत व्हावी, ही इच्छा

सध्याची इमारत जीर्ण झाली आहे. मात्र, या इमारतीने अनेक अधिकारी पाहिले आहेत. आपलीही बरीच वर्षे या इमारतीत गेली आहेत. माझी निवृत्तीही या इमारतीतच व्हावी, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे आताच्या ठिकाणी नूतन इमारतीचे प्रयत्न सुरू असले तरी जुन्या इमारतीत जे समाधान होते ते नवीन इमारतीत असेल की नाही माहिती नाही.

– आरटीओ शिवानंद मगदूम

Related Stories

बेळगाव-वेंगुर्ले रोडवरील हॉटेलमध्ये 45 हजाराची चोरी

Patil_p

भाजप सरकार हिटलर प्रवृत्तीपासून दूर

Amit Kulkarni

खुनासाठी प्रेरणा ‘दृष्यम्’ सिनेमाची

Amit Kulkarni

खानापूर लायन्स क्लबचा अधिकारग्रहण समारंभ

Amit Kulkarni

पश्चिम भागात रोप लागवडीस प्रारंभ

Patil_p

अलोककुमार यांनी केली पोलिसांच्या आरोग्याची विचारपूस

Patil_p
error: Content is protected !!