एससीएम ऑल इंडिया ओपन फिडे रेटिंग रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव
हुबळी येथे एससीएम ऑल इंडिया ओपन फिडे रेटिंग रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत बेळगावच्या गोल्डन स्क्वेअर अकादमीने उपविजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेत गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धिबळपटूंनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मानांकन मिळविले. बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रेय राव यांनी या स्पर्धेत 12 वे स्थान पटकावले. त्यांना 2000 रुपये रोख बक्षीस देण्यात आले. क्लासिकल फिडे रेटिंगमध्ये त्यांनी 1561, रॅपिड रेटिंगमध्ये 1609 तर ब्लिट्झ फिडे रेटिंगमध्ये 1719 मानांकन मिळविले. गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमीचे संचालक आणि बुद्धिबळ प्रशिक्षक प्रशांत अणवेकर यांना क्लासिकल फिडे रेटिंगमध्ये 1388 मानांकन गुण प्राप्त झाले.
साईप्रसाद खोकाटे या बुद्धिबळपटूला क्लासिकल फिडे रेटिंग 1119 तर रॅपिड फिडे रेटिंग 1202 मिळाले. त्याला 1200 रुपये रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. साई मंगनाईकला रॅपिड फिडे रेटिंग 1159 प्राप्त झाले. साहिल भट्टचे क्लासिकल फिडे रेटिंगमध्ये 1156, निश्चल सखदेवला क्लासिकल फिडे रेटिंगमध्ये 1145 तसेच अनिरुद्ध दासरीना क्लासिकल फिडे रेटिंगमध्ये 1020, रॅपिड फिडे रेटिंग 1027, ब्लिट्झ फिडे रेटिंग 1029 मिळाले. माधव दासरीला रॅपिड रेटिंग 1002 मिळाले तर साकेत मेळवंकीला रॅपिड रेटिंग 1020 मिळाले. गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धिबळपटूंना प्रशिक्षक प्रशांत अणवेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ संघाला रोख रक्कम 2000 आणि ढाल देऊन गौरविण्यात आले.