क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
पदवीपूर्व शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धेत गोमटेश पदवीपूर्व महाविद्यालय संघाने अंतिम सामन्यात बागेवाडी संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
व्ही. बी. संबरगी पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धेत हिंदवाडी येथील गोमटेश पदवीपूर्व महाविद्यालय संघाने अंतिम सामन्यात बागेवाडी महाविद्यालय संघाचा 2-0 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. हा संघ पदवीपूर्व महाविद्यालयीन राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या विजेत्या संघाचे गोमटेश विद्यापीठाचे अधि÷ाता व माजी आमदार संजय पाटील, गोमटेश पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य महेश कारेकर, प्रशिक्षक अनिल जनगौडा, श्रीहरी लाड यांनी या संघाचे अभिनंदन केले.