Tarun Bharat

कार कंपन्यांसाठी ‘अच्छे दिन’?

चालू वर्षात विक्रमी 35 लाख वाहनांची विक्री होण्याचे संकेत

नवी दिल्ली

Advertisements

 दीर्घ कालावधीपासून कच्चा मालाचे भाव कमी होत असल्याने चालू वर्षात देशातील वाहन क्षेत्राला अच्छे दिन येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यामध्ये चालू वर्षात विक्रमी कार्सची विक्रमी विक्री होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यादरम्यानच्या काळात कार खरेदीदारांना सवलतही मिळणार आहे.

मागील तीन वर्षात देशातील वाहन उद्योग लॉकडाऊन, कच्च्या मालाच्या किमतीमधील वाढ, पुरवठा साखळीतील अडथळे, सेमिकंडक्टर व अन्य कम्पोनेंटसंबंधीत समस्या, वाढती इंधन दरवाढ यासारख्या अडचणींचा प्रवास करत होता. मात्र आता मागील महिन्यात स्टील, ऍल्युमिनियम, तांबे, पॅलेडियमच्या किमतीत 10 ते 20 टक्के कपात झाली आहे. कार निर्मितीमध्ये 70 टक्के धातूचा सहसा वापर केला जात असतो. याचे भाव कमी होत असल्यामुळे निर्मितीवरचा खर्च आटोक्यात येताना दिसतो आहे. यामध्ये सेमिकंडक्टरची समस्या काहीशी दूर होत असून आता कार उत्पादनालाही वेग घेता येणार आहे.

मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी यावेळी म्हटले आहे, की प्रवासी कारच्या विक्रीसाठी चालू वर्ष महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये विक्रमी म्हणजे 35.5 ते 35.5 लाख कार्सची विक्री राहणार असल्याची माहिती आहे.

Related Stories

उत्सवासाठी ‘एलजी’कडून नवे टीव्ही बाजारात

Omkar B

ऍमेझॉनकडून एक लाख जणांना रोजगार

Patil_p

‘एस ऍण्ड पी’ने जीडीपी अंदाज घटविला

Amit Kulkarni

बजाज ऑटो गुंतवणार300 कोटी रुपये

Patil_p

ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये साखर उत्पादन 42 टक्क्यांनी वधारले

Patil_p

झोमॅटो आयपीओ आणण्याच्या तयारीत

Patil_p
error: Content is protected !!