वाढत्या खाद्यतेलाच्या किमतीचा परिणाम : कृषी खात्याकडून इंदोरसह इतर ठिकाणांहून बियाणे मागविणार
प्रतिनिधी /बेळगाव
खाद्यतेलांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने सोयाबीनच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा सोयाबीनला अच्छे दिन आले आहेत. परिणामी येत्या खरीप हंगामात सोयाबीनच्या पेरणीत 10 टक्क्मयांनी वाढ होईल, असा अंदाज कृषी खात्याने व्यक्त
केला आहे.
जिल्हय़ात सोयाबीन पेरणीकडे शेतकऱयांच्या कल वाढला आहे. त्यामुळे सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. याकरिता कृषी खात्याकडून इंदोरसह इतर ठिकाणांहून सोयाबीन बियाणे मागविली जाणार आहेत. तसेच शेतकऱयांना वेळेत बि-बियाणे आणि खते पुरविली जातील, अशी माहिती कृषी खात्याने दिली आहे. येत्या खरीप हंगामात 52 हजार क्विंटल बि-बियाणे लागतील असा अंदाज खात्याने बांधला आहे. दरम्यान, मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर रयत संपर्क केंद्र आणि कृषी पत्तीन संघातून बि-बियाणे उपलब्ध केली जाणार आहेत.
खरीप हंगाम तोंडावर आल्याने कृषी खात्याने शेतकऱयांना वेळेत बि-बियाणे, खते व कीटकनाशके पुरविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात भात, भुईमूग, तूर, मूग, मका पेरणीबरोबर सोयाबीनची पेरणी केली जाते. मात्र यंदा तेलाच्या किंमती भरमसाठ वाढल्याने सोयाबीन आणि भुईमूगच्या पेरणीत वाढ होणार आहे. विशेषतः सोयाबीन आणि भुईमूग शेंगापासून खाद्यतेलाची निर्मिती केली जाते. त्यामुळे यंदा सोयाबीन आणि भुईमूग पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे.
यंदा जिल्हय़ात 2.62 लाख मेट्रिक टन खत लागण्याची शक्मयता आहे. हा खताचा पुरवठा देखील वेळेत केला जाईल, अशी माहिती कृषी खात्याने दिली आहे. येत्या हंगामात जिल्हय़ात तब्बल 1.10 लाख हेक्टर क्षेत्रात लागवडीची शक्मयता खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे यंदा जिल्हय़ात सोयाबीनचे पीक अधिक प्रमाणात दिसणार आहे.
यंदा वळीव पाऊस अधिक झाल्याने शेतीकामांना वेग आला आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. पावसाने पोषक वातावरण निर्माण झाल्याने मशागतीची कामे सोयीस्कर होत आहेत.
पावसाला सुरुवात झाल्यानंतर बि-बियाणे-खताचा पुरवठा खरीप हंगामात वेळेत बियाणे खते पुरविण्यासाठी पूर्व बैठक घेण्यात आली आहे. सर्व तालुका सहाय्यक अधिकारी व रयत संपर्क केंद्रांना सूचना करण्यात आल्या आहेत. पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱयांना बि-बियाणे व खते पुरविली जाणार आहेत.
– शिवनगौडा पाटील (उपनिर्देशक, कृषी खाते)
पिके | लागवड हेक्टर क्षेत्रात |
ऊस | 2.88 |
मका | 1.17 |
सोयाबीन | 1.6 |
भात, तूर, मूग व इतर | 60 हजार |