Tarun Bharat

दिवाळीपूर्वीच खूशखबर!

Advertisements

केंद्रीय कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केंद सरकारने दिवाळीपूर्वी देशातील केंद्रीय कर्मचाऱयांना मोठी खूषखबर दिली आहे. ऐन नवरात्रोत्सवातच सरकारने डीएमध्ये 4 टक्क्मयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. या वाढीव डीएमुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱयांना आता 38 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62 लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे. डीएची वाढलेली रक्कम यंदाच्या जुलैपासून लागू होणार असून कर्मचाऱयांना मागील महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱयांना महागाई भत्ता दिला जातो, तर निवृत्त वेतनधारकांना महागाई सवलत दिली जाते. गेल्या दहा-बारा तिमाहींमधील डीए वाढीच्या तुलनेत आता सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी डीएमध्ये सरासरी केवळ 3 टक्के वाढ करण्यात येत होती, मात्र यावेळी वाढत्या महागाईचा फटका पाहता सरकारने डीएमध्ये अधिक वाढ केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्चमध्ये सातव्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्त्यात (डीए) 3 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार डीए मूळ वेतनाच्या 34 टक्के करण्यात आला. आता पुन्हा 4 टक्क्यांच्या वाढीमुळे तो 38 टक्के झाला आहे.

महागाई भत्ता एकाचवेळी 11 टक्के

गेल्यावषी जुलैमध्ये मोदी सरकारने कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात एकरकमी 11 टक्क्मयांनी वाढ केली होती. यानंतर प्रभावी महागाई भत्ता 17 टक्क्मयांवरून थेट 28 टक्के करण्यात आला. कोरोनाच्या काळात सरकारने जानेवारी 2020, जुलै 2020 आणि जानेवारी 2021 चा महागाई भत्ता दिला नव्हता. त्यानंतर गेल्यावषी जुलैमध्ये एकदम 11 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.

पगारात मोठी वाढ होणार

कर्मचाऱयांचा डीए 4 टक्के वाढवल्यामुळे यावेळी पगारात मोठी वाढ होणार आहे. समजा एखाद्या कर्मचाऱयाचा मूळ पगार 40,000 रुपये असल्यास डीए 4 टक्क्मयांनी वाढवल्यामुळे त्याच्या पगारात दरमहा 1,600 रुपयांची वाढ होईल. अर्थातच वर्षभरात एकूण 19,200 रुपये वाढ होणे अपेक्षित आहे.

रेल्वे कर्मचाऱयांना 78 दिवसांचा बोनस

मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांमध्ये रेल्वे कर्मचाऱयांना मोठा बोनस देण्याची घोषणाही करण्यात आली. या कर्मचाऱयांना मोदी सरकार 78 दिवसांचा बोनस देणार आहे. दरवर्षी रेल्वे विभागाला मिळालेल्या उत्पन्नानुसार कर्मचाऱयांना बोनस देण्याची घोषणा केली जाते. तथापि, यंदा मात्र केंद्र सरकारने इतर कर्मचाऱयांचा डीए वाढवतानाच रेल्वे कर्मचाऱयांसाठीचा निर्णय जाहीर केल्यामुळे त्यांना महिनाभर आधीच ‘गुड न्यूज’ मिळाली.

रेल्वेस्थानक पुनर्विकासासाठी 10 हजार कोटी

देशातील 3 सर्वात मोठी स्थानके नवी दिल्ली, मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि अहमदाबाद स्टेशनच्या पुनर्विकासासाठी 10 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. देशातील 199 रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. 47 स्थानकांसाठी निविदा काढण्यात आल्या असून 32 स्थानकांवर काम सुरू झाले आहे. नवी दिल्ली, मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि अहमदाबाद स्टेशन या देशातील 3 सर्वात मोठय़ा स्थानकांच्या पुनर्विकासासाठी 10 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Related Stories

‘शाओमी इंडिया’वर ईडीची मोठी कारवाई

Patil_p

दिल्लीत 2,706 नवे कोरोना रुग्ण; 69 मृत्यू

Tousif Mujawar

नाशिक येथे होणारे 94 वे साहित्य संमेलन स्थगित

Patil_p

सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या 10-12 वीच्या परीक्षेचा निकाल 15 जुलैपर्यंत

Tousif Mujawar

भारतात एकूण लसीकरणाने केला 94 लाखाचा टप्पा पार

Tousif Mujawar

लालूप्रसाद यादव यांना 5 वर्षांचा कारावास

Patil_p
error: Content is protected !!