रायगड- किल्ले रायगडवर सोमवारी शिवराज्याभिषेक सोहळा मोठा उत्साहात पार पडला. याला काही तास उलटून गेले असताना एक आनंदाची वार्ता शिवप्रेमींनी ऐकायला मिळणार आहे. या बातमीने रायगडच्या ऐतिहासिक खजिन्यात आणखी वाढ होणार आहे. आज गडावरील आणि पायथ्याशी स्वच्छता मोहीम राबवत असताना बा रायगड परिवाराला एक तोफ मिळून आली आहे. एका झाडाच्या शेजारी त्यांना ही तोफ मिळाली असून त्याची माहिती पुरातत्व विभागाला देण्यात आली आहे. रायगडवर ही तोफ सापडल्यामुळे शिवप्रेमींच्या मध्ये आनंदाचं वातावरण आहे.
सोमवारी मोठ्या उत्साहात रायगडावर शिवराज्याभिषेक दिन पार पडला. यावेळी राज्यासह देशभरातून शिवप्रेमींची उपस्थिती होती. दरम्यान शिवराज्यभिषेक सोहळ्याची गर्दी लक्षात घेता कालपासून बार रायगड टीमने गडाच्या परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. या स्वच्छता मोहिमेत बा रायगड यांच्या शिवप्रेमींना जुनी तोफ आढळून आली. अर्धवट जमिनीत गाडलेली खूप निदर्शनास येतात शिवप्रेमींच्या मध्ये आनंदाचं वातावरण होतं. त्यांनी तात्काळ या बाबतची माहिती प्रशासनाला दिली आहे. त्याबाबत बा रायगड परिवाराने फेसबुक वरून महाराष्ट्रातील शिवप्रेमींना ही आनंदवार्ता दिली आहे. ती खालील प्रमाणे-
“छत्रपती शिवरायांच्या आशिर्वादाने किल्ले रायगडावर एक अपरिचित तोफ बा रायगडाच्या धुळीकणांना निदर्शनास आली….. पुरातत्व विभाग आणि रायगड प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली तोफेचे संवर्धन लवकरच करू…सविस्तर माहिती पुरातत्व,छत्रपती संभाजी महाराज ,रायगड प्राधिरकरण यांना पाठवण्यात आली आहे..सविस्तर आढावा लवकरच…”