Tarun Bharat

मान्सूनसरींची आनंदवार्ता !

केरळात 10 दिवस आधी मान्सून धडकण्याचा अंदाज

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कडाक्याच्या उन्हात मान्सूरसरींसंबंधी दिलासादायक आनंदवार्ता समोर आली आहे. युरोपियन सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्टनुसार (ईसीएमडब्ल्यूएफ) नुसार, चालूवर्षी मान्सून 10 दिवस अगोदर देशात दाखल होऊ शकतो. या अंदाजानुसार सर्वसाधारणपणे मान्सून केरळच्या किनारपट्टीवर 20/21 मे रोजीच धडकू शकतो. दरवर्षी केरळमध्ये साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवडय़ात मान्सून दाखल होतो. त्यानंतर देशाच्या इतर भागात पोहोचतो.

बंगालच्या उपसागरात नुकतेच झालेले हवामान बदल आणि अरबी समुद्रात अँटिसायक्लोन क्षेत्र तयार होत असल्यामुळे मान्सून केरळमध्ये लवकरच पोहोचू शकतो. त्याच्या प्रभावाखाली पश्चिम विभागाच्या इतर भागातही पाऊस पडू शकतो, असा अंदाज ‘ईसीएमडब्ल्यूएफ’ने व्यक्त केला आहे. तसेच भारतीय हवामान विभागानेही यापूर्वीच सॅटेलाईट ईमेजमधून समोर आलेल्या माहितीचा आधार घेत मान्सून वेळेवर येण्याची शक्मयता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर स्कायमेट वेदर सर्व्हिसेसचे महेश पलावत यांनीही मान्सून अपेक्षित वेळेच्या आसपास सुरू होईल असे म्हटले आहे. 

शेती-भातीची भिस्त मान्सूनवर अवलंबून मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो आणि जुलैच्या मध्यापर्यंत देशभर पसरतो. त्यामुळे देशातील एकूण पावसापैकी 70 टक्के पाऊस नैर्त्रुत्य मान्सूनमधून पडतो. भारतातील निम्मी रब्बी पिके या मान्सूनवर अवलंबून आहेत. देशात 40 टक्के शेतकरी सिंचनासाठी मान्सूनवर अवलंबून आहेत. भात, कापूस, ऊस, मसूर, हरभरा, मोहरी ही खरीप पिके घेणारे शेतकरी या पावसाळय़ावर अवलंबून आहेत. 

Related Stories

…तर तुम्ही काश्मीरमध्ये चालते व्हा !

Patil_p

दिल्लीत कोरोना रुग्णांनी ओलांडला 6.40 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

पंजाब काँग्रेसमधील कलह पोहोचला दिल्लीदरबारी

Amit Kulkarni

राजस्थान : लॉक डाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांनी सरकारी शाळेचा केला कायापालट

prashant_c

राज्यातील 52 लाख शेतकऱयांच्या खात्यावर 1049 कोटी रु. जमा

Patil_p

लसीकरणाच्या युद्धात ‘कोव्हॅक्सिन’ची ही उडी

datta jadhav