प्रतिनिधी /खानापूर
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने तालुक्यात दुर्गामाता दौडला गावागावातून सुरुवात झाली आहे. नंदगड भागातील खैरवाड येथे यावर्षी दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच वर्षी दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
नवरात्रौत्सवात रोज सकाळी 6 वाजता चव्हाटेश्वर मंदिरात शिवपूजन झाल्यानंतर दुर्गामाता दौडला प्रारंभ करण्यात येत आहे. गावातील वेगवेगळय़ा मार्गावर दौड काढण्यात येते. दर दिवशी एका गल्लीत दौडची सांगता करण्यात येत आहे. दौडमध्ये गावातील युवक, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी होत आहेत. पहाटेपासूनच गावात मंगलमय वातावरण निर्माण होत असून ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा तसेच मंगलगीते, स्फूर्तीगीत म्हणत दौड काढण्यात येते. पहिल्यावर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.