Tarun Bharat

‘तरुण भारत’ कार्यालयाला इनरव्हील सदस्यांची सदिच्छा भेट

क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणार

प्रतिनिधी /खानापूर

खानापूर शहरात नव्याने स्थापन झालेल्या इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा व पदाधिकाऱयांनी येथील ‘तरुण भारत’ कार्यालयाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्यांनी ‘तरुण भारत’चे संस्थापक कै. बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.

यावेळी इनरव्हीलच्या अध्यक्षा शिल्पा अद्यांताय, सचिव श्रीदेवी जोरापूर, खजिनदार शरयू कदम, प्रवक्त्या आरती पाटील, सदस्या निर्मला देसाई, वर्षा देसाई, समृद्धी सुळकर उपस्थित होत्या. शहरात नव्याने स्थापन झालेल्या इनरव्हील क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक, महिला सबलीकरण, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यात पहिल्यांदाच क्लबची सुरुवात करण्यात आली आहे.

Related Stories

नगर राजभाषा अंमलबजावणी समितीतर्फे हिंदी दिवस-पारितोषिक वितरण

Omkar B

ध्वनीक्षेपकाची मोडतोड करणाऱया तिघा जणांवर एफआयआर

Patil_p

जुन्या म.फुले रोडचे अखेर डांबरीकरण

Patil_p

दुर्लक्षित अनमोड महामार्गाचीअखेर गोव्याने केली डागडुजी

Amit Kulkarni

हयात प्रमाणपत्रांसाठी पोस्ट विभाग ठरतोय सोयीचा

Patil_p

खानापूर-लेंढा-रामनगर महामार्ग पावसाळय़ापूर्वी खुला करा

Patil_p