प्रतिनिधी / बेळगाव
प्रसिद्ध अभिनेते प्रियदर्शन जाधव गुरुवारी बेळगाव भेटीवर आले होते. यावेळी ‘तरुण भारत’ला त्यांनी सदिच्छा भेट दिली. संस्थापक बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तरुण भारतने 1947 मधील अंकाची विशेष पुरवणी प्रसिद्ध केली होती. त्याची प्रत त्यांना देण्यात आली. ‘तरुण भारत’च्या एकूण प्रगतीबद्दल प्रियदर्शन यांनी कौतुकोद्गार काढले.