Tarun Bharat

‘लोकमान्य सोसायटी’च्या कार्यालयाला महेश काळे यांची सदिच्छा भेट

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

सरस्वती वाचनालयाच्या निमंत्रणावरून बेळगाव दौऱयावर आलेले गायक महेश काळे यांनी मंगळवारी सकाळी लोकमान्य सोसायटीच्या गुरुवारपेठ येथील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी यांनी त्यांचा शाल अर्पण करून पुष्पगुच्छ व लामणदिवा देऊन सत्कार केला. तसेच त्यांचे शिष्य शिवश्री कंदप्रसाद, प्रल्हाद जाधव व अंकुर चांदे यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी महेश काळे म्हणाले, ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात बेळगावमधून झाली. कटय़ारने लोकांपर्यंत माझे गाणे पोहोचविले. यात बेळगाव महत्त्वाचे आहे. शाकुंतलचा पहिला प्रयोग येथे झाला हे सुद्धा विशेष आहे. बेळगाव ही कला आणि संगीत यांच्या दृष्टिने सुपीक भूमी आहे.
या भूमीत अनेक कलाकार घडले आहेत. त्या भूमीतील श्रोत्यांसमोर गाणे सादर करणे, हे नेहमीच आनंददायी आहे.

महेश काळे यांनी सोसायटीच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून लोकमान्य सोसायटी व अध्यक्ष किरण ठाकुर यांच्याशी आपले जिव्हाळय़ाचे नाते आहे. सोसायटीने नेहमीच आपली आतिथ्यशीलता दाखविली आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन समन्वयक विनायक जाधव यांनी केले.

याप्रसंगी संचालक सुबोध गावडे, विनायक धामणेकर, सोसायटीचे सीएफओ वीरसिंग भोसले, सीईओ अभिजित दीक्षित, कर्नल दीपक गुरूंग, प्रभाकर पाटकर, गुरुनाथ पाटील तसेच कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

Related Stories

शाळा पूर्णवेळ भरलो अन् मुले आनंदली!

Amit Kulkarni

अधिकाऱयांच्या ‘त्या’ अहवालाला विरोध

Amit Kulkarni

पट्टणकुडीत 14 लाखांचे दागिने लंपास

Amit Kulkarni

कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीचे सॅम्पल डेल्टापेक्षा वेगळे

Archana Banage

काँक्रिटीकरणानंतर डेनेज चेंबर बांधण्याचे काम

Amit Kulkarni

सांख्यिकी खात्याकडून अर्बन प्रेम सर्व्हे

Amit Kulkarni
error: Content is protected !!