Tarun Bharat

गुगलचे सीईओ पिचाई ‘पद्मभूषण’ने सन्मानित

सॅन फ्रान्सिस्को / वृत्तसंस्था

गुगलशी संबंधित कंपनी ‘अल्फाबेट’चे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी त्यांना हा सन्मान दिला. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांनी स्वीकारला. त्यांना 2022 साठी व्यापार आणि उद्योग श्रेणीत पद्मभूषण प्राप्त झाला होता. सन्मान मिळाल्यावर पिचाई यांनी भारत देश आपल्यासाठी सर्वस्व असल्याचे प्रतिपादन केले आहे. या बहुमूल्य सन्मानासाठी मी भारत सरकार आणि भारतीय जनतेचा खूप आभारी असल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

सुंदर पिचाई हे मूळचे तामिळनाडूतील चेन्नई येथील आहेत. 50 वषीय पिचाई यांचा जन्म 10 जून 1972 रोजी मदुराई, तामिळनाडू येथे झाला. त्यांनी आयआयटीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातून मास्टर्स केले आणि त्यानंतर व्हार्टन स्कूलमधून एमबीए शिक्षण घेतले. 2004 मध्ये त्यांनी ‘गुगल’मध्ये नोकरी सुरू केली होती. 2014 मध्ये सुंदर पिचाई गुगलचे प्रमुख बनले. तसेच 2019 पासून ते गुगलची सहकंपनी ‘अल्फाबेट’च्या सीईओपदाची धुरा सांभाळत आहेत. पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पंतप्रधानांनी निवडलेल्या पद्म पुरस्कार समितीकडून विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱया दिग्गजांना दरवषी हा पुरस्कार दिला जातो.

Related Stories

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

datta jadhav

उत्तरप्रदेशच्या विधानसभेत ‘सप’चा गोंधळ

Patil_p

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 7 दिवस होम क्वारंटाईन

Patil_p

काय तर म्हणे, पाक नव्हे देशाला मोदींकडून धोका

Patil_p

दिल्लीत चोवीस तासांत 384 कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

हाथरस बलात्कार अन् हत्येप्रकरणी दोषीला मृत्युदंड

Amit Kulkarni