तरूण भारत प्रतिनिधी
कॉफीच्या एस्प्रेसो मशीनचा शोध लावणारे अँजेलो मोरिओन्डो ( Angelo Moriondo ) यांच्या 171 व्या जयंतीनिमित्त Google सर्च इंजीनने एक वेगळ्या आणि कलात्मक डूडलसह त्यांना अभिवादन केले आहे. 1884 मध्ये सर्वात अगोदर एस्प्रेसो मशीनचे ( Espresso Machines ) पेटंट घेण्याचे श्रेय मोरिओन्डो यांना देण्यात आलं होत.
ओलिव्हिया व्हेन या आर्टिस्टने तयार केलेल्या Google डूडलमध्ये पहिल्या ज्ञात एस्प्रेसो मशीनचे GIF या प्रकारची इमेज दर्शवली असून ते कॉफीने रंगवलेले आहे.
ट्युरिन, इटली येथे 6 जून 1851 रोजी अँजेलो मोरिओन्डो यांचा जन्म झाला. मारिओंडो यांच्या घरी औद्योजिकतेचा वारसा होता. त्यांचे बालपण हे नवनवीन शोध आणि संकल्पना प्रत्यक्षात पाहण्यात गेलं. मोरिओन्डोच्या आजोबांनी दारूचे उत्पादन करणाऱ्या कंपनीची स्थापना केली होती जी नंतर त्यांच्या वडीलांनी चालवली. मोरिओन्डोने त्याचा भाऊ आणि चुलत भाऊ यांच्यासोबत “मोरिओन्डो आणि गॅरिग्लिओ” ही लोकप्रिय चॉकलेट कंपनी बनवली.
या काळात इटलीमध्ये कॉफी लोकप्रियतेच्या शिखरावर होती. इटलीमधील सर्वात जास्त पिले जाणारं पेय म्हणून ओळख होती. पण कॉफी प्रेमींची सगळ्यात मोठी अडचण कॉफी तयार करताना लागणारा वेळ ही होती. या गैरसोयीचा प्रचंड सामना करावा लागत होती.
” इटलीमध्ये 19 व्या शतकात, कॉफी ही सर्वात लोकप्रिय गोष्ट होती. पण, कॉफी बनवण्याच्या पद्धतींमुळे रसिकांना पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ वाट बघावे लागत होते. ते अँजेलो मोरिओन्डो होते, ज्यानी पहिले एस्प्रेसो मशीन तयार करून पेटंट घेतले.” असे Google ने आपल्या डुडल नोटमध्ये म्हटले आहे.
कॉफी पिणाऱ्या लोकांना येणाऱ्या अडचणी दूर करणाऱ्या या मशिनमध्ये एक मोठा बॉयलर होता. या बॉयलरमधून कॉफी ग्राउंडच्या बेडमधून येणारे गरम पाणी ढकलले जात होते आणि दुसऱ्या बॉयलरमध्ये तयार झालेली वाफ कॉफीच्या बेडवर फ्लॅश केल्यावर पेय तयार होत असे.