सुविधांच्या मदतीने रस्त्यावरील सुरु असणाऱया कामाची मिळणार माहिती
नवी दिल्ली
मागील खूप दिवसांपासून प्रतिक्षेत असणाऱया फिचर्सचे अर्थातच ‘गुगल स्ट्रीट व्यू’ फिचर याचे गुगलने भारतामध्ये सादरीकरण केले आहे. कंपनीने जवळपास 15 वर्षाच्या पूर्वी याला अमेरिकेत सादर केले होते. म्हणजे लोकांना आता घरात बसूनही लँडमार्कची माहिती होणार आहे. तसेच कोणत्याही ठिकाणांची माहितीही करुन घेत येणार असल्याची माहिती आहे.
यामध्ये साधारणपणे गुगल मॅपमध्ये आता लोकल ट्रफिक पोलीसाच्या मदतीने स्पीड मर्यादा, कोणता रोड बंद होणार किंवा तेथे सुरु असणाऱया कामाची माहिती मिळणार आहे.
टेक महिंद्रासोबत हातमिळवणी
गुगल स्ट्रीट व्यू फिचर्सला कंपनीने ऍडव्हान्स मॅपिंग सोल्यूशन कंपनी जेनेसिस इंटरनॅशनल आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, कन्सल्टिंग आणि बिजनेस री इंजिनिअर्स सर्व्हिस व सोल्यूशनची लीडिंग कंपनी टेक महिंद्रा यांच्यासोबत हातमिळवणी केली असल्याची माहिती आहे.
बेंगळूरमध्ये मिळणार पहिली सेवा
स्ट्रीट व्यू गुगल मॅप आता फक्त बेंगळूर येथे मिळणार आहे, त्यानंतरच सेवा अन्य शहरात उपलब्ध होणार असून यामध्ये हैदराबाद आणि नंतर कोलकाता या शहरांचा समावेश होणार आहे. काही कालावधी गेल्यानंतर मग चेन्नई, दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक, वडोदरा, अहमदनगर आणि अमृतसरसह भारतामधील विविध शहरांमध्ये ही सेवा कार्यरत होणार असल्याचे गुगलने सांगितले आहे.