7 प्रो मध्ये 48 एमपी कॅमेऱयाची सुविधा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गुगल कंपनीने न्यूयॉर्कमधील ‘मेड बाय गुगल’ इव्हेंटमध्ये आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर केला आहे. पिक्सल 7 या मॉडेलची किंमत 59,999 रुपये आणि पिक्सल 7 प्रो या मॉडेलची किंमत 84,999 रुपये असणार आहे. गुगलने आपल्या 5 जी स्मार्टफोनसह स्मार्टवॉचदेखील बाजारात सादर केले आहे.
या इव्हेंटमध्ये, गुगलने आपला पहिला टॅबलेट आणि इअरबड्सदेखील उतरवला आहे. टॅबलेट 2023 मध्ये लॉन्च केला जाईल. भारतात, तुम्हाला 13 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवर मोबाइल खरेदी करता येईल. मोबाइलचे प्री-बुकिंगही सुरु झाले आहे.
पिक्सल 7 मध्ये स्टोरेजचे दोन पर्याय
6.3 इंच फुल एडी प्लस क्रीन डिस्प्लेसह गुगल पिक्सल 7 ची सुरुवातीची किंमत 59,999 रुपये आहे. यात 4270 एमएएच बॅटरी आणि 30 चा चार्जर असणार आहे. यामध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा मिळणार आहे.
4926 एमएएचची बॅटरी
84,999 रुपयांपासून सुरू होणाऱया पिक्सल 7 प्रोमध्ये 6.7-इंचाच्या एचडी डिस्प्ले क्रीनचा समावेश असणार आहे. यामध्ये 4926 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार आहे.
ट्रिपल रिअर कॅमेऱयांसह 7 प्रो
7 प्रो मध्ये 50 मेगापिक्सल मेन, 12 मेगापिक्सल अल्ट्रावाइड आणि 48 मेगापिक्सल टेलीफोटो कॅमेरा मिळणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.