Tarun Bharat

“म्हसोबाला नाही बायको,सटवाईला नाही नवरा”; पडळकरांचा ‘मविआ’वर हल्लाबोल

Advertisements

Gopichand Padalkar : “म्हसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा”,अशी अवस्था राष्ट्रवादी,शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे,अश्या बोचऱ्या शब्दांत भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे.तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सेनाच्या नावाखाली घोषणाबाजी करत असून राष्ट्रवादीकडून उदय सामंत यांच्या गाडीवरचा हल्ला करण्यात आला आहे,असा आरोपही आमदार पडळकरांनी केला आहे,ते आटपाडी मध्ये बोलत होते.

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची सुरू असलेला “निष्ठा यात्रा आणि आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गळ्यात भगवा मफरेल घालून घोषणाबाजी करत आहेत,ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे जात आहेत,तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत,त्यामुळे हा झंजावात दौरा नाही, एकमेकांना ही फक्त मदत सुरू आहे असेही ते म्हणाले.

हेही वाचा- शिवसेनेला आक्रमक चेहरा मिळणार; लक्ष्मण हाके शिवबंधन बांधणार


मविआवर निशाणा साधताना ते म्हणाले, “म्हसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा”,अशी अवस्था राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे. पुण्यात शिवसेनेचे कार्यकर्ते नाहीत.त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीची कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनच हा हल्ला झाला असल्याचा आरोप करत याआधी आपल्यावर हल्ले झालेते राष्ट्रवादीकडून झाले होते,असेही आमदार पडळकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Related Stories

‘शिवशाहीर’ पर्वाचा अस्त

Patil_p

नितेश राणेंना अटक की दिलासा? जामीन अर्जावर आज सुनावणी

Abhijeet Shinde

केरळमधील लॉकडाऊनमध्ये 30 मे पर्यंत वाढ : मुख्यमंत्री पिनराई विजयन

Rohan_P

कोरोना : देशातील ‘या’ सहा राज्यांत सर्वात जास्त मृत्यू : लव अग्रवाल

Rohan_P

गोकुळमध्ये शेतकरी प्रतिनिधी का नको – राजू शेट्टी

Abhijeet Shinde

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचा २६ वर्षांचा प्रवास

Abhijeet Shinde
error: Content is protected !!