Tarun Bharat

…अन्यथा आंदोलन करू; गोपीचंद पडळकरांचा इशारा

Advertisements

सांगली : प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यतील नेवासा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्या कुटुंबियांना प्रशासनाने नाहक त्रास दिल्याचा आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. याच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचा इशारा पडळकरांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिला आहे.

दरम्यान, मुलीला सुखरूप आई वडिलांकडे सुपूर्द करण्याच्या कारवाईसाठी आदेश द्यावेत अशी विनंती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना केली.
सोशल मिडीयावर बोलताना पडळकर म्हणाले, “आम्हा धनगरांची पोरगी तीचं नगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील अंतरवाली या गावातून अपहरण करण्यात आले आहे. तिच्या आई वडीलांनी ६ मे २०२२ रोजी तक्रार दाखल केल्यानंतर पीआय बाजीराव पवार यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी आई-वडीलांना अश्लील शिवीगाळ करित दमदाटी करून १ लाख पंचवीस हजार रूपये वसूल केले आहेत.” “सदर बाब ही पोलीस अधीक्षकांना सांगितल्यानंतर तसा त्यांनी तक्रारकर्त्यांचा जवाबपण नोंदविलेला आहे.”

अपह्रत मुलीला सुखरूप आई वडिलांच्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश द्यावेत. तसेच संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी पडळकरांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

Related Stories

डॉक्टर तरुणीची आत्महत्या : भुलीचे इंजेक्शन घेवून संपवले जीवन

Kalyani Amanagi

युपी : आणखी दोन दिवस वाढवले लॉकडाऊन!

Rohan_P

कोल्हापुरात १० कार फोडल्या, राजवाडा पोलिसांनी स्वप्नील तावडे या युवकाला घेले ताब्यात

Abhijeet Khandekar

राज्यात नवीन ७९० कोरोना बाधित रुग्ण; रुग्णांची संख्या १२ हजार २९६

Abhijeet Shinde

भरधाव कार झाडावर आदळुन पाचजण जागीच ठार

Sumit Tambekar

फायनान्स कंपन्यांची वसुली थांबण्यासाठी पंचगंगा नदीपात्रात महिलांचे उपोषण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!