नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेस (टीसीएस) चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी राजीनामा दिला आहे. बाजारमूल्यात देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी म्हणून टीसीएसची ओळख आहे. यामध्ये प्रथमच कंपनीच्या सीईओंनी आपला कार्यकाळ पूर्ण करुन राजीनामा दिल्याची घटना घडली आहे. आता कंपनीच्या सीईओ पदाची धुरा ही नवीन सीईओ कृतिवासन हे 16 मार्चपासून सांभाळणार आहेत.
आर्थिक वर्ष 2023मध्ये टीसीएसचे बाजारमूल्य हे जवळपास 168 अब्ज डॉलरच्या घरात पोहोचले होते. गोपीनाथन यांच्या नेतृत्वात टीसीएसने महसूल व अन्य क्षेत्रात मजबूत कामगिरी केल्याची नोंद आहे. यासोबतच त्यांनी कंपनीसोबत जवळपास 22 वर्षांपर्यंतचा प्रवास केला आहे.
भावूक झाले गोपीनाथन
22 वर्षांच्या कालावधीपर्यंत टीसीएससोबत व मागील सहा वर्षांपासून तर त्यांनी कंपनीच्या सीईओ पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली असल्याची नोंद केली आहे. यावेळी ते म्हणाले की, या 22 वर्षांचा पूर्ण आनंद कामाच्यावेळी घेता आला. यावेळी मी खुप काही गोष्टी नवीन शिकलो तर काही नवीन अनुभवही घेता आल्याचेही त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देताना सांगितले आहे.