Tarun Bharat

थायलंडमध्ये शरण घेणार गोटाबाया राजपक्षे

Advertisements

11 ऑगस्ट रोजी बँकॉकला पोहोचणार

वृत्तसंस्था/ सिंगापूर

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे सिंगापूरनंतर आता थायलंडमध्ये शरण घेणार आहेत. थायलंडची राजधानी बँकॉक येथे ते आज पोहोचणार असल्याचे समजते. श्रीलंकेतील आर्थिक संकटादरम्यान देश सोडून पलायन करणारे गोटाबाया विविध देशांमध्ये शरण घेत आहेत. 14 जुलै रोजी ते मालदीवमार्गे सिंगापूरमध्ये पेहोचले होते.

श्रीलंकेतील सरकारने अलिकडेच सिंगापूरच्या अधिकाऱयांना माजी राष्ट्रपती राजपक्षे यांना आणखी काही दिवस शरण देण्याची विनंती केली होती. व्हिसा कालावधी समाप्त झाल्याने राजपक्षे हे आजच सिंगापूर सोडणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. परंतु थायलंडमध्ये माजी राष्ट्रपती शरण घेणार असल्याच्या वृत्ताप्रकरणी श्रीलंका सरकारने कुठलेच वक्तव्य केलेले नाही. तर थायलंड सरकारनेही याप्रकरणी कुठलीच टिप्पणी केलेली नाही.

श्रीलंकेत मागील 7 दशकांमधील सर्वात बिकट आर्थिक संकट उभे ठाकल्यावर गोटाबाया यांना देशवासीयांच्या संतापाला तोंड द्यावे लागले होते. 9 जुलै रोजी हजारोंच्या संख्येतील निदर्शकांनी राष्ट्रपती निवासस्थान आणि कार्यालयात धाव घेतली होती. यामुळे गोटाबाया यांनी देशातून पलायन केले होते. 

मायदेशी न परतण्याचा सल्ला

श्रीलंकेचे विद्यमान राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी गोटाबाया यांना देशात न परतण्याचा सल्ला दिला आहे. माजी राष्ट्रपतींनी देशात परतण्याची ही योग्य वेळ नसल्याचे विक्रमसिंघे यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. तर श्रीलंकेतून पलायन केल्यावर गोटाबाया यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली नाही.

Related Stories

अत्यंत विचित्र आहेत व्यक्तीचे हात

Patil_p

अमेरिकेच्या टेक्सास, फ्लोरिडात पुन्हा निर्बंध

datta jadhav

चीनकडून सिनोफार्मच्या लसीला मंजुरी

Patil_p

महिला प्रवाशांच्या निर्वस्त्र झडतीने वाद

Omkar B

कुवेतमध्ये भारतीय डॉक्टरचा मृत्यू

Patil_p

इंडोनेशियातील भूकंपात मोठी पडझड, 34 बळी

Patil_p
error: Content is protected !!