Tarun Bharat

इस्रायलमधील सरकार संकटात

Advertisements

आघाडी सांभाळणे अवघड ः पंतप्रधानांनी दिली कबुली ः 2 आठवडय़ांमध्ये गमवावे लागू शकते पद

वृत्तसंस्था / जेरूसलेम

इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्या आघाडी सरकारवर संकटाचे ढग दाटू लागले आहेत. हे सरकार पूर्वीच अल्पमतात होते आणि विरोधी पक्षांपेक्षा केवळ एक खासदार अधिक होता. आता या आघाडीतील एका पक्षाने यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायलमध्ये दोन वर्षांमध्ये 4 सरकारे अल्पमत आल्याने वारंवार निवडणूक घ्यावी लागत आहे. पुढील 1 किंवा 2 आठवडय़ांमध्ये आमचे सरकार राहणार का कोसळणार हे निश्चित होणार असल्याचे उद्गार पंतप्रधान बेनेट यांनी काढले आहेत.

8 पक्षांच्या आघाडीत सामील अरब समर्थक पार्टी युनायटेड अरब लिस्ट आता पॅलेस्टाईनच्या मुद्दय़ावरून बेनेट सरकारवर नाराज आहे. पॅलेस्टिनींच्या वस्तींवरून पूर्वीच सरकारसोबत वाद सुरू होता. बेनेट सरकार पॅलेस्टिनींच्या वस्तींमध्ये ज्यूंना जागा देत असून हा अरब वंशीय लोकांसोबत अन्याय असल्याचे या पक्षाचे म्हणणे आहे.

यामिन पार्टीचे खासदार नीर ओरबाक यांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावर बेनेट यांना आणखीन एक झटका बसला आहे. याचबरोबर सरकार 59 जागांसह अल्पमतात आले आहे. पंतप्रधान बेनेट हे अरब पार्टीसमोर गुडघे टेकत असल्याचा आरोप ओरबाक यांनी केला आहे.

नेतान्याहू परतणार का?

बेनेट सरकार कोसळल्यास माजी पंतप्रधान बेंजामीन नेतात्याहू पुन्हा एकदा सत्तेवर येऊ शकतात. याकरता त्यांना केवळ एक किंवा दोन खासदारांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. इस्रायलच्या राजकारणात काहीच निश्चित नसते. बेनेट हे नेतान्याहू यांना हटवून पंतप्रधान झाले होते. नेतान्याहू यांना बेनेट यांचे राजकीय  गुरु मानले जायचे. नेतान्याहू हे 12 वर्षे पंतप्रधान राहिले आहेत. राजकीय अस्थिरतेच्या स्थितीत नेतान्याहू हेच पुढील पंतप्रधान होणार असल्याचे मानले जात आहे.

Related Stories

देवमाशाने गिळले तरीही बचावला

Patil_p

श्वान अन् महिलेसोबत राहतो ब्लॅक पँथर

Patil_p

युएनएससी स्थायी सदस्यसाठी भारताला ब्रिटनचा पाठिंबा

Patil_p

सर्वात वास्तव्ययोग्य देश ‘सिंगापूर’

Patil_p

जगभरात कोरोनाचे 1737 बळी

tarunbharat

कोरोनामुळे मज्जासंस्थेचे विविध विकार

Patil_p
error: Content is protected !!