ट्रायकडून सादर होणार नवे फिचर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आता तुम्हाला ट्रू कॉलर ऍपच्या मदतीशिवाय अज्ञात क्रमांकावरून आलेल्या कॉलची माहिती मिळू शकणार आहे. दूरसंचार नियामक ट्राय एका नव्या यंत्रणेवर काम करत आहे. या यंत्रणेद्वारे कुठल्याही फोनवर कॉलरच्या नावाची माहिती सिमकरता करविण्यात आलेल्या केवायसीशी निगडित नावाद्वारे मिळणार आहे.
सद्यकाळात एखादा कॉल आल्यास स्क्रीनवर केवळ संबंधित क्रमांक दिसून येतो. परंतु ट्रायची ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर फोनवर युजरचे केवायसी नाव देखील दिसून येणार आहे. या यंत्रणेमुळे कुणी कॉल केल्यास स्क्रीनवर त्याचे नाव देखील झळकणार आहे.
हे फिचर बऱयाचअंशी ट्रू कॉलरप्रमाणेच काम करणार आहे. दूरसचार विभागाने ट्रायला यावर काम सुरू करण्यास सांगितले आहे. ट्रायचे अध्यक्ष पी.डी. वाघेला यांनी ही यंत्रणा पुढील काही महिन्यांमध्ये उपलब्ध होऊ शकते असे विधान केले आहे.
सध्या आम्हाला याप्रकरणी काही सूचना मिळाल्या असून लवकरच आम्ही यावर काम सुरू करणार आहोत. ट्राय पूर्वीच अशाप्रकारच्या व्यवस्थेकरता विचार करत होती. परंतु दूरसंचार विभागाकडून सूचना मिळाल्याने यासंबंधीचे काम लवकर सुरू होणार असल्याचे वाघेला यांनी म्हटले आहे. हे फिचर उपलब्ध झाल्यावर फेक कॉल्सपासून युजर्स वाचू शकतील. प्रेमवर्क पूर्ण झाल्यावर या फिचरसंबंधी अधिक माहिती उपलब्ध होणार असल्याचे वाघेला म्हणाले. ट्रू कॉलर सारख्या कॉलिंग ऍप्स अशाप्रकारची फिचर्स उपलब्ध करतात. परंतु यात युजर्सचे केवायसी आधारित नाव दिसून येत नाही. नवे फिचर उपलब्ध झाल्यावर स्पॅम आणि फ्रॉड कॉल्सच्या वाढत्या प्रकारांमध्ये घट होऊ शकते असे तज्ञांचे मानणे आहे.