5-जी आणण्याच्या तयारीला वेग ः 3300 ते 3670 एमएचझेड, 700 एमएचझेड बँड प्राईस घटवली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या जगासह भारतामध्ये 5-जी नेटवर्क लागू करण्यासाठी विविध टप्प्यावरील तयारीने वेग पकडला असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये आता भारतामध्ये 5-जी एअरवेव्सच्या 700 एमएचझेड आणि 3300 ते 3670 एमएचझेड बँडच्या बेस किमतीमध्ये कपात करण्याची शिफारस टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया(ट्राय) यांनी केली आहे. साधारणपणे 700 एमएचझेड बँडच्या किमतीत 40 टक्के कपात करण्यासोबत एमएचझेडने 3300ते3670 एमएचझेड बँडच्या किमतीत 36 टक्के कपात करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
ट्रायने दिलेल्या माहितीनुसार रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया ऑपरेर्ट्सच्या बाजूने बोली आकर्षित करण्यासाठी किमतीत कपात केली आहे. यामध्ये सध्याच्या बँड्समध्ये 700 एमएचझेड, 800, 900, 1800,2100, 2300, 2500 एमएचझेड, आणि 600, 3300ते3670 एमएचझेड आणि 24.25 ते 28.5 जीएचझेड च्या नवीन स्पेक्ट्रम बँडचा लिलाव करण्यात येणार आहे.
15 ऑगस्टपर्यंत 5 जी सादर करण्याची योजना
सरकार ट्रायवर दबाव बनवत असल्याचे संकेत असून तसेच मार्च महिन्यापर्यंत आपले मूल्य निर्धारण करण्याचा प्रस्ताव पाठविता येणार होता. त्यानंतर मे महिन्यात सरकार 5 जी स्पेक्ट्रमची विक्री करु शकणार होते. सरकार भारतीय स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टपर्यंत सादर करण्याच्या तयारीत आहे.