Tarun Bharat

शिरगावातील धोंडांच्या तळीचा विस्तारिकरणाचा सरकारदरबारी प्रस्ताव

जलस्रोत खात्याकडे फाईल. सुमारे 250 चौ. मी. तळी रूंद करण्याचे नियोजन. सरकारने व मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी.

डिचोली / प्रतिनिधी

  शिरगाव येथील प्रसिध्द देवी लईराईच्या जत्रोत्सवात लाखेंच्या संख्येने धोंडगण आणि भाविकांना स्नान घालणारी धोंडांच्या तळीचे विस्तारिकरण व्हावे व ती सुरळीतपणे धोंडगणांना वापरण्यास मिळावी यासाठी शिरगाव पंचायतीतर्फे राज्य सरकारच्या जलस्रोत खात्याकडे प्रस्ताव घालण्यात आला आहे. या प्रस्तावाप्रमाणे काम झाल्यास तळीचे सुमारे 250 चौ. मी. रूंदीकरण होणार आहे. अशी माहिती शिरगावचे सरपंच भगवंत गावकर यांंनी दिली.

  शिरगावातील धोंडगणांची पवित्र तळी ही वार्षिक जत्रोत्सवात लाखेंच्या संख्येने धोंडगणांना.आणि भाविकांना स्नान देते. देवीचा कळसही याच तळीवर स्नानासाठी येतो. याच तळीतील तीन ओंजळी पाणी कळसान भरले जाते. परंतु दरवषी वाढणाऱया देवीच्या धोंडगणांसाठी हि तळी आता अपुरी पडू लागली आहे. त्यासाठी या तळीचे रूंदीकरण व्हावे व जत्रोत्सवात तिचा धोंडगण व भाविकांना सुरळीतपणे लाभ घेता यावा अशी भावना आहे.

   या अपेक्षेप्रमाणे शिरगाव पंचायतीतर्फे राज्य सरकारच्या जलस्रोत खात्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सध्या सदर कामाची फाईल जलस्रोत खात्यात असून मागील सरकारच्या वेळी तत्कालीन आमदार प्रवीण झांटय़े यांनी सदर कामाचा पाठपुरावा केला होता. परंतु त्यानंतर विधानसभा निवडणुकीचा गोंधळ आचारसंहिता यामुळे सदर काम राहून गेले होते.   आता नव्याने सरकार स्थापन होऊन कामकाजालाही वेग आला आहे. जलस्रोत खाते मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. आत जत्रोत्सव संपन्न झाला असून पुढील वषीच्या जत्रोत्सवापूर्वी या पवित्र तळीचे विस्तारीकरण व्हावे यासाठी स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांनी संबंधित खात्याकडे पाठपुरावा करावा. तसेच देवीच्या चरणी दरवषी भेट देऊन दर्शन घेणाऱया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या कामात लक्ष घालावे आणि तत्परतेने या विशेष कामाचा पाठपुरावा करून कामाला सुरूवात करावी. जेणेकरून पुढील वषी जत्रोत्सवापूर्वी सदर तळीचे रूंदीकरण व सुशोभीकरण झाल्यास धोंडगणांना व भाविकांना स्नानासाठी चागली सोय होणार आहे, अशी मागणी सरपंच भगवंत गावकर यांनी केली.

Related Stories

मुख्य सचिवांसह सर्व सचिवांच्या खात्यांमध्येही आता बदल

Amit Kulkarni

राफेल खरेदी प्रकरणात मोठा भ्रष्टाचार

Omkar B

ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचे कृत्य लांछनास्पद

Patil_p

शाळा सुरू होण्याची शक्यता धूसर

Amit Kulkarni

कार्मीभाट मेरशी सातेरी देवीचा वर्धापनदिन-जत्रोत्सव उद्यापासून

Amit Kulkarni

मांगल्यदायी दीपावलीला आजपासून प्रारंभ

Patil_p