Tarun Bharat

खनीज वाहूक ट्रकांना मिळणात सरकारी कर सवलत

प्रतिनिधी /पणजी

राज्यातील खनिज वाहूक ट्रकांना आता सरकारी कर सवलत मिळणार असल्याचे समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. राज्यातील खाण व्यवसाय लवकरच सुरु होणार असून त्या अगोदर खनिज डंप उचलणे सुरु होणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून बंद असलेल्या ट्रकांना पुन्हा रस्त्यावर येण्यासाठी विविध सरकारी कर भरावे लागतात सरकारने कर सवलत दिल्याने ट्रकमालकांना मोठा दिलासा मिळणार आहे असेही मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

काल पणजीत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत मंत्री सुभाष फळदेसाई बोलत होते यावेळी त्यांच्या सोबत पाळी जिल्हापंचायत सदस्य गोपाळ सूर्लकर उपस्थित होते. खनिज वाहतू करणारे ट्रक जे खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर बंदच होते. त्या ट्रकांसाठी ही सवलत लागू होणार असून जे ट्रक खाण व्यवसाय बंद झाल्यानतंर अन्य व्यवसायाकडे म्हणजे रेती वाहतूक किंवा चिरे वाहतूक करत होते त्यांना सर्व सरकारी कर लागू असतील असेही फळदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील खाण व्यवसाय हा गोव्याच अर्थिक कणा आहे. गेल्या कित्येक वर्षापासून खाण व्यावसाय बंद असल्याने आर्थिक कणा निकामी झाला होता. गोवा सरकारने विशेस्तः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतलेल्या परीश्रमामुळे राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. केंद्र सरकाने गोव्यातून निर्याद होणाऱया खनिजावरील 50 टक्के कर रद्द केला आहे तर पिग आयर्न वरील 15 टक्के कर रद्द केला आहे. याचा मोठा फायदा गोव्याला होणार आहे. असेही फळदेसाई यांनी सांगितले.

खाणी बंद झाल्यामुळे खाण भागातील लोकांच्या राहणीमानावर मोठा परीणाम झाला आहे. जवळ जवळ इतर सगळेच व्यवसाय ठप्प झाले आहेत. ट्रक जाग्यावर असल्याने ट्रक मालकांची परिस्थिती बिकट झाली आहे. कै.पर्रीकर सरकारच्यावेळी ट्रक मालकांना काही प्रमाणात आर्थिक मदत करण्यात आली होती. हे सगळे चित्र बदलण्यासाठी राज्यातील खाण व्यवसाय सुरु करणे गरजेचे आहे म्हणून डॉ. प्रमोद सावंत सरकारने केंद्र सरकारकडे खाण व्यवसायाचा विषय लावून धरला आणि अखेर गोवा सरकारला मोटे यश मिळाले आहे. राज्यातील खाण व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारच्या वतीने सर्व सोपस्कर पूर्ण केले जातील असेही फळदेसाई यांनी सांगितले.  

गोव्यातून निर्याद होणारे खनिज हे कमी दर्जाचे असल्याने त्याला जास्त मागणी नव्हती. शिवाय तेच खनिज निर्याद करायचे असल्यास 50 टक्के कर भरावा लागत होता. त्यामुळे खाणीवर खनिजचे डंप वाढत होते. हे खनिज नंतर पिग आयर्न मध्ये बदलून निर्याद केले जायचे त्याच्यावर 15 टक्के कर भरावा लागत होता. आता हे कर रद्द केल्यामुळे कमी दर्जाचे खनिज निर्याद करणे सोपे जाईल व खाणीवर खनिज डंप उरणार नाहीत. त्यामुळे खाण व्यावसाय सुरळीत होण्यास मदत होइल असेही फळदेसाई यांनी सांगितले.

आयआयटी सांगेतच होईल असे मंत्र सुभाष फळदेसाई यांनी ठापपणे सांगितले. आयआयटी सांगेतून बाहेर जाणार काय या प्रश्नला उत्तर देताना फळदेसाई बोलत होते. सांगेत आयाआयटी प्रकल्प उभारण्यासाठी अनेक समस्या निर्माण होत असतानाच सांगे भागात जी जागा आयआयटीसाठी निवडण्यात आली आहे ती जागा कमी पडणार असल्याचे आयआयटी प्रकल्प अधिकाऱयांनी सांगितले असल्याने आता नवी समस्या निमार्ण झाली आहे त्याच्यावर काय उपाय काढणार असे विचारले असता ते म्हणाले की आयआयटी प्रकल्पासाठी जितकी जागा पाहिजे तितकी जागा उपलबध्द करून देणार आणि आयआयटी प्रकल्प सांगे भागातच होणार आहे. 

Related Stories

परेड मैदानावरील कचरा 30 दिवसांच्या आत हटवा

Omkar B

सांगे भागात विजेचा लपंडाव सुरुच

Omkar B

सांस्कृतिक देवाणघेवाणासाठी फ्रान्स आणि सेरेंडिपिटी आर्ट्समध्ये करार

Patil_p

सीआरझेड मान्यता नसलेले कॅसिनो बंद करा

Amit Kulkarni

डेंगर-शिरोडा येथील वाघ्रोसिद्ध देवस्थानचा 25 रोजी मुर्ती प्रतिष्ठापना सोहळा

Patil_p

कोरोना नियमांचे पालन करावे

Omkar B