सातारा : डॉ. भावेश भाटिया यांच्या मोळेश्वर ता. महाबळेश्वर येथील सनराईज कँडल्स आणि वॅक्स म्युझियमला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली.
यावेळी वॅक्स म्युझियममध्ये मेणापासून तयार करण्यात आलेल्या आकर्षक व सुवासिक मेणबत्त्या, हस्तकला वस्तू यांची पहाणी करुन तेथे काम करणाऱ्या दिव्यांगांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांचे कोश्यारी यांनी कौतुक केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी संगिता चौगुले, तहसिलदार सुषमा पाटील, डॉ. भावेश भाटिया, निता भाटिया, राजन ढेबे आदी उपस्थित होते.