वार्ताहर/ पाचगणी
युवकांनी मोबाइलचा मोह टाळून पुस्तकाचे वाचन करावे , पुस्तक वाचल्याने माणूस समृद्ध होतो.म्हणून पुस्तक आवर्जून वाचा असा युवकांना सल्ल्ला देत राज्याचे राज्यपाल भगतसिहं कोशारी यांनी पुस्तकाच्या गावाला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली .येथील गावाने प्रकल्पासाठी केलेल्या सहकार्याची आणी देत आसलेल्या योगदानाची प्रशन्सा केली . खेळीमेळीच्या वातावरणात या गावात तब्बल एक तास राज्यपाल कोश्यारी रममान झाले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाबळेश्वर दौयावर आले असताना त्यांनी पुस्तकाचे गाव भिलारला भेट दिली
या वेळी राज्य मराठी विकास संस्थेचे उपसंचालक श्यामकांत देवरे, तहसीलदार सुषमा चौधरी -पाटील , वाई च्या पोलीस उपविभागीय शीतल जानवे ा खराडे, प्रांताधिकारी संगीता चौगुले -राजापूरकर, सरपंच शिवाजीराव भिलारे,उपसरपंच सुनीता भिलारे, प्रवीण भिलारे, नितीन भिलारे,राजेंद्र भिलारे,तानाजी भिलारे प्रकल्प समन्व्यक विनय मावळणकर, तेजस्विनी भिलारे, गणपत पार्टे, अनिल् भिलारे अदि मान्यवर उपस्थित होते.प्रकल्प कार्यालयात राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत भिलारचे सरपंच शिवाजीराव भिलारे , बाळासाहेब भिलारे यांचे चिरंजीव नितीन भिलारे आणी राज्य मराठी विकास संस्थे चे उपसंचालक श्यामकांत देवरे यांनी केले
भेटी दरम्यान त्यांनी प्रथम पुस्तकाच्या प्रकल्प कार्यालयास भेट दिली तेथील कामकाजाची माहिती घेतली आणी प्रकल्प कार्या ची ध्वनी ा चित्रफित पहिली.त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक स्व. भिलारे गुरुजी यांच्या येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चरित्र आणी गडकिल्ले या पुस्तकाच्या दालनास भेट दिली यावेळी त्यांचे स्वागत प्रशांत भिलारे ,राजेंद्र भिलारे आणी त्यांच्या कुटूंबीयांनी केले.