गेल्या काही वर्षापासून राज्यात अनेक राजकिय कारणामुळे चर्चित असणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी (Governor Koshyari) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांना आपला राजीनामापत्र पाठवून मला या पदतून मुक्त होण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. राजभवनाने जारी केलेल्या निवेदनात राज्यपाल कोश्यारी यांनी आपले उर्वरित आयुष्य वाचन, लेखन आणि इतर उपक्रमामध्ये घालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे असे म्हटले आहे.
“संत, समाजसुधारक आणि शूर सेनानींची भूमी असलेल्या महाराष्ट्रासारख्या महान राज्याचा राज्यसेवक किंवा राज्यपाल म्हणून काम करणे हा माझ्यासाठी अत्यंत सन्मानाचे होते” असे राज्यपाल कोश्यारी यांनी प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीदरम्यान त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपालपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचेही कोश्यारी यांनी सांगितले.
विधानसभेच्या राज्यपाल नियुक्त सदस्याच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडी (MVA) आणि राज्यपाल कोशारी यांचा वाद चांगलाच विकोपाला गेला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजीं महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याविरोधात राज्यातील महत्वाचा विरोधक महाविकास आघाडीने वातावरण चांगलेच तापवले होते होते. त्यानंतर ही फुले दाम्पंत्य यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. तसेच गुजराती आणि मारवाडी लोकांमुळेच महाराष्ट्र सूजलाम सूफलाम असल्याचेही त्यांनी वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानावर विधिमंडळात पडसाद उमटले होते.

