प्रतिनिधी /फोंडा
गोव्याचे राज्यपाल पी.एस श्रीधरन पिल्लई मंगळवार 24 मे रोजी सायं. 3.30 वा. शिरोडा येथील श्री कामाक्षी संस्थान व श्री लक्ष्मी नारायण संस्थानात सदिच्छा भेट देणार आहेत. त्यानंतर स्थानिकांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिरोडय़ाचे आमदार सुभाष शिरोडकर, सरपंच व पंचसदस्य उपस्थित असतील. स्थानिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.