माशेल पंचक्रोशीत राज्यपाल श्रीधरन यांचे स्वागत डायलिसेस रूग्णांनी पुरविली आर्थिक मदत
वार्ताहर /माशेल
गोवा खऱया अर्थाने जाणून घ्यायचा असल्यास, राज्यातील सर्व खेडयाचे दर्शन घेणे गरजेचे आहे. गोवा राज्याचा राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळताना अत्यानंद होत असून राज्यातील शंभर खेडी पादंक्रत करण्याचा आपला मनोदय असल्याचे गोवा राज्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी क्य़क्त केला.
ते बेतकी खांडोळा, वेरे वाघुर्मे, वळवई , केरी, तिवरे वरगांव भोम अडकोण आणि वेलिंग प्रियोळ पंचायत ‘गोवा स्वयंपुर्ण याग’ या कार्यक्रमात बेतकी येथील बीग बी सभागृहात केले. यावेळी त्याच्यासमवेत क्रीडा मंत्री गोविंद गावडे, संयुक्त जिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर, उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, गटविकास अधिकारी अश्विन देसाई, बेतकीचे सरपंच दिलीप नाईक, तिवरे वरगांव पंचायतीच्या सरपंच उन्नती नाईक, वेरे वाघुर्मे सत्यवान शिलकर, केरीच्या सरपंच अनिषा गावडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की गोव्यात सुंदर समुद्र किनारा लाभलेला असून पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या नकाशावर केंद्रबिंदू आहे. गोव्यातील खेडीही तेवढीच सुंदर असून त्यात प्राचीन मंदिराचा समावेश आहे. पर्यटनस्थळे तयार करावी असेही त्यांनी सुचविलं याकामी गोविंद गावडे सारखे विकासाच्यादृष्टीने काम करणारे नेते गोव्याचा विकास झपाटय़ाने करतील असा विश्वास क्यक्त केला. कोकणी ही अंत्यत सुंदर भाषा आहे. त्यासाठी मी कोकणी शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. कोचीमध्ये कोकणी सेंटर करण्याचा प्रयत्न करीन असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना मंत्री गोवेंद गावडे म्हणाले की मतदारसंघात अनेक शेतकरी कबाडकष्ट करीत आहे. परंतू जमिनी स्वतःच्या नसल्याने त्याला पैशाची प्राप्ती होत नाही, शिवाय कित्येक शेतकऱयाच्या खटले रखडलेले आहे त्या सुटत नसल्याचने शेतकरी अडचणीत येत असतात. प्रियोळ मतदारसंघ कला व संस्कृतीने भरलेला आहे. येथील देव मंदिरे पर्यटकांना भुरळ घालतात. श्री मंगेश मंदिरत जगाच्या नकाशावर असून तिथे दररोज शेकडो लोक येतात. हा परिसर ‘टॅम्पल सिटी’ झाला पाहिजे. प्रियोळ मतदारसंघातील नैसर्गिक झरे असून त्याचे जतन बेतकी खांडोळा पंचायतीचे लोकांनी करून त्या झऱयाची पाण्य़ाचे ते पाणी पिण्य़ासाठी योग्य उपयोग करीत अस्ल्याची माहिती दिली.
यावेळी सरपंच दिलीप नाईक यांनी खारेपाणी शेतात येऊन शेतजमिनी खराब होतात त्याचप्रमाणे शेतकऱयांना मालकी हक्क नसल्याचा तसेच विकासासाठी अधिक फंडाची गरज असल्याचे सरपंचानी सांगितले. यावेळी राज्यपालांनी वीस डायलेसीस रूग्णांना प्रत्येकी रू. 25 हजार रूपये देऊन आर्थिन मदत केली. आजपर्यंत त्यांनी शंभर गावांना भेटी दिल्या असून सुमारे 300 डायलेसीस रूग्णांना आर्थिक मदत पुरविलेली आहे.
राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना खांडोळा येथील श्री महागणपतीचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानचे प्रितम खांडेपारकर यांनी गणेश मंदिराविषयी महोदयांना माहिती दिली. यावेळी देवस्थानतर्फे राज्यपालांना श्रीफळ देऊन सन्मान केला. त्यानंतर ते माशेल येथील श्री देवकीकृष्ण मंदिरात जाऊन देवकीकृष्ण दर्शन घेतले. सुशांत नाईक यांनी आभार मानले.