माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवाचे प्रतिपादन
नवी दिल्ली
येत्या पाच-सहा वर्षांत ‘जेनेसिस’ कार्यक्रमांतर्गत 10,000 हून अधिक स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याची सरकारची योजना असल्याची महिती नुकतीच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अल्केश कुमार शर्मा यांनी दिली आहे. यासोबतच बहुतांश स्टार्टअपसाठी वित्त व्यवस्था करणे ही समस्या नाही आणि ते विविध मार्गांनी वाढीसाठी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे..
आर्थिक बाबतीत ही समस्या अजिबात नाही. मात्र आता आम्ही पुढच्या टप्प्यावर जात आहोत जिथे जेनेसिस येणार आहे. आम्ही हा कार्यक्रम सुरू करणार आहोत. पुढील पाच-सहा वर्षांत आम्ही 10,000 हून अधिक लोकांना प्रोत्साहन देणार आहोत. असेही सचिवांनी नमूद केले आहे.
सरकारकडून कार्यक्रमांची घोषणा
सरकारने गेल्या जुलैमध्ये डिजिटल इंडिया जेनेसिस कार्यक्रमाची
घोषणा केली होती. नाविन्यपूर्ण स्टार्टअप्ससाठी नेक्स्ट जनरेशन सपोर्ट प्रोग्राम ’जेनेसिस’साठी 750 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.