Tarun Bharat

अनिल देशमुखांविरोधात माफीचा साक्षिदार करा- सचिन वाझे

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मनी लाँड्रिग प्रकरणात (money laundering case) राज्याच्या दोन मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshamukh) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांचा समावेश आहे. परंतु अनिल देशमुखच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनी लाँड्रिग प्रकरणात सचिन वाझे (Sachin Vaze) माफीचा साक्षीदार होणार आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीआणखी वाढणार आहेत. भ्रष्टाचार प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार आहे. सचिन वाझेच्या अर्जावर ३० मो रोजी सीबीआय कोर्टात सुनावणी होणार आहे. सचिन वाझेनी भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आहे. या अर्जाला सीबीआयनेसुद्धा होकार दिला आहे. यामुळे आता सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे

मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि वसुलीच्या आरोपांखाली अटकेत असलेल्या सचिन वाझेंनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला आहे. तर सचिन वाझेचाही या प्रकरणामध्ये संबंध आहे. तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सचिन वाझेंचे सीबीआय कोर्टासमोर साक्ष होणार आहे. यामध्ये सचिन वाझे काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Stories

नोकरी लावण्याच्या अमिषाने 5 लाखांची फसवणूक,संभाजीपूरच्या एकावर गुन्हा दाखल

Kalyani Amanagi

मास्क न लावल्यास 100 तर थुंकल्यास 200 रुपये दंड

Archana Banage

पेठवडगावात बारा कोरोना रुग्णांची भर, एकूण रुग्ण संख्या ६८

Archana Banage

पाटगांव धरण ४६ टक्के तर कोंडूशी लघुप्रकल्प १०० टक्के पाणीसाठा

Archana Banage

प्रत्येक घटकाची विद्यापीठाशी एकनिष्ठता वाखाणण्यासारखी

Archana Banage

सवलतीच्या दरात रशियाकडून तेल खरेदी करण्याचा केंद्राचा विचार

Abhijeet Khandekar