वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा माजी कसोटीवीर तसेच सलामीचा फलंदाज ग्रॅहॅम थॉर्पचे दीर्घकालिन आजाराने वयाच्या 55 व्या वर्षी निधन झाले. 2022 पासून थॉर्पवर वैद्यकीय इलाज सुरू होता.
ग्रॅहॅम थॉर्पने 1993 ते 2005 या कालावधीत 100 कसोटीत इंग्लंडचे प्रतिनिधीत्व करताना 44.66 धावांची सरासरी राखत 16 शतके नोंदविली होती. 2022 साली थॉर्पची अफगाण क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या पश्चात पत्नी अमंदा तसेच चार मुले असा परिवार आहे. थॉर्पने आपल्या 17 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये जवळपास 20 हजार धावा नोंदविल्या आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळातर्फे थॉर्पला श्रध्दांजली वाहण्यात आली.