प्रतिनिधी /पर्वरी
ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच्या पहिल्या पेन्ह दी फ्रा?क पंचयातीच्या ग्रामसभेत आज बेकायदेशीर जेटी प्रश्न,भटकी जनावरे, झाडेजुडपे ,मालीम परिसरात अनधिकृती बांधकामे या व अशाच अनेक प्रश्नांच्या सरबतीने बरीच गाजली.सरते शेवटी सरपंच स्वप्नील चोडणकर यांनी अनधिकृत बांधकाम पडण्याची नोटीस पाठविली असल्याचे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
आजच्या ग्रामसभेत सरपंच चोडणकर यांच्यासह सचिव सचिन नाईक, पंच सदस्य शांताराम नाईक, विश्रांती देसाई, घनश्याम नाईक,सिद्धेश नाईक, सिद्धार्थ शिरोडकर, सफर फडते,फ्रान्सिस डिसो?ा, माटिल्डा वाज तसेच मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सुरवातीला सचिव सचिन नाईक यांनी मागील ग्रामसभेचा इतिवृत्ता?त वाचून त्यावर ग्रामस्था?ची मंजुरी घेतली. आग्नेलो परेरा यांनी पंचायत क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबद्दल न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांबद्दल सद्यस्थिती काय आहे, भटकी कुत्री,पावसाळय़ानंतर वाढलेल्या आणि अपघातास कारणीभूत होणाऱया झुडुपांबद्दल तसेच बेकायदेशीर व्यवसायाबद्दल प्रश्न उपस्थित केला.
यावेळी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक समित्यांचे गठन करण्यात आले. जैवविविधता समिती,वाहतूक व्यवस्थापन समिती, कचरा व्यवस्थापन समिती,आणि ग्राम मुले विकास समिती आणि ग्राम विकास समिती यांचा समावेश आहे. त्यात गावातील तज्ञ लोकांची निवड करण्यात आली. तसेच सचिव नाईक यांनी 2021-22 या वर्षाचा जमाखर्च वाचून दाखविला व त्यावर ग्रामस्था?ची मंजूरी घेतली. विद्यमान पंचायत मंडळाची ही पहिलीच ग्रामसभा होती त्यामुळे ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या ग्रामसभेत जेटींचा विषय गाजला. काही बेकायदेशीर जेटी वापरात येतात त्यांना समज देऊन रात्री दहा नंतर संगीत वाजवू न देण्याची तसेच रस्त्यावर वाहने पार्क करू नये अशी ताकीद देण्याची मागणी ग्रामस्थानी केली. मालीम परिसरात अनधिकृत बांधकामाबद्दल ग्रामस्थानी विचारले असता संबंधितांना बांधकाम पाडण्याची नोटीस देण्यात आली आहे असे सरपंच चोडणकर यांनी सांगितले. एकंदरीत आजची ग्रामसभा जेटी प्रश्नावरून बरीच गाजली.