वॉशिंग्टन
ग्रॅमी पुरस्कार विजेते ब्रुक्स आर्थर यांचे मंगळवारी रात्री वयाच्या 86 व्या वषी निधन झाले. ‘द कराटे किड’मध्ये त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आर्थर यांना बहुचर्चित ग्रॅमी पुरस्कारासाठी जवळपास वीस वेळा नामांकन मिळाले होते. त्यांनी या पुरस्कारावर तीनवेळा आपले नाव कोरले होते. आर्थर हे एक प्रख्यात निर्माताही होते. त्यांनी ‘ब्राऊन आईज्ड गर्ल’ यासह ‘व्हॅन मॉरिसन’ आणि ‘नील डायमंड’सारख्या लोकप्रिय गीतांचे पार्श्वगायन केले आहे. तसेच त्यांनी सह-लेखन आणि सह-निर्मिती देखील केली होती.