Tarun Bharat

उद्यापासून भव्य दुर्गामाता दौड

Advertisements

देव, देश आणि धर्म संस्काराचे मिळणार धडे

बेळगाव / प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांचा जयघोष व दुर्गादेवीचा गजर करीत सोमवार दि. 26 सप्टेंबरपासून शहर तसेच तालुक्यातून भव्य दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. दुर्गामाता दौडसाठी शहर भगवेमय झाले असून सर्वत्र जय्यत तयारी केली जात आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे दौड काढण्यावर निर्बंध आले होते. यावषी मात्र जल्लोषपूर्ण वातावरणात दुर्गामाता दौड काढण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे.

तरुणांवर देव, देश व धर्म यांचे संस्कार शिवप्रति÷ान हिंदुस्थानच्या माध्यमातून केले जातात. व्यसनाच्या आहारी गेलेल्या पिढीवर चांगले संस्कार व्हावेत, यासाठी शहराच्या प्रत्येक भागातून दुर्गामाता दौड काढली जाते. हजारो धारकरी दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होऊन आपल्यातील जाज्वल्य राष्ट्रभक्तीचे दर्शन घडवितात. दुर्गामाता दौड ज्या विभागामध्ये जाते तेथील नागरिकांमधून जय्यत तयारी करण्यात येते. आकर्षक कमानी, देखावे, फुलांची सजावट करण्यात येते.

मागील दोन वर्षांत कोरोनामुळे साध्या पद्धतीने दौड काढावी लागली होती. यावषी भव्यदिव्य दौडचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारी पहाटे शिवाजी उद्यान येथील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वंदन करून दुर्गामाता दौडला सुरुवात होणार आहे. परंपरेनुसार छत्रे गुरुजींच्या हस्ते पूजन केले जाणार आहे. यावर्षीच्या दौडमुळे सर्वत्र नवचैतन्य पसरेल, असा विश्वास धारकरी व्यक्त करीत आहेत.

दौडची आचारसंहिता

ज्या विभागात दौड काढली जाणार आहे, त्या विभागातील प्रत्येक हिंदू घरावर भगवा ध्वज फडकवावा, रांगोळी घालताना त्यामध्ये ओम किंवा स्वस्तिक काढू नये, दौडमध्ये सहभागी होताना डोक्यावर पांढरी टोपी अथवा भगवा फेटा परिधान करावा, परंतु त्या फेटय़ावर कोणत्याही प्रकारची कलाकुसर अथवा जरीकाम असता कामा नये. दौडमध्ये सहभागी होणाऱया प्रत्येकाने पारंपरिक पेहराव करावा, असे आवाहन शिवप्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

सोमवार दि. 26 चा मार्ग

सोमवारी शिवाजी उद्यान येथून दुर्गामाता दौडला सुरुवात होणार आहे. त्यानंतर हुलबत्ते कॉलनी, महात्मा फुले रोड, एसपीएम रोड, संतसेना रोड, पाटीदार भवन रोड, शास्त्राrनगर, गुड्सशेड रोड, कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, आठल्ये रोड, महाद्वार रोड चौथा क्रॉस, माणिकबाग रोड, समर्थनगर, महाद्वार रोड तिसरा व दुसरा क्रॉस, संभाजी गल्ली, एसपीएम रोडमार्गे कपिलेश्वर मंदिरात सांगता.

Related Stories

प्रेमप्रकरणातून जन्मले, झाडाला नेऊन टांगले!

Patil_p

अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याचे संकेत

Amit Kulkarni

शिवाजी विद्यापीठाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ घ्या

Amit Kulkarni

बॉक्साईट रोडवर बर्निंग कारचा थरार

Amit Kulkarni

बालकांना अंगणवाडीत लसीकरण

Patil_p

राज्य ऍथलेटीक्स स्पर्धेत विश्वंभर कोलेकरला दोन सुवर्णपदके

Amit Kulkarni
error: Content is protected !!