Tarun Bharat

खानापुरात प्रो कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

  अंजली निंबाळकर फाऊंडेशनच्यावतीने मलप्रभा क्रीडांगणावर आयोजन : विविध स्वामीजींसह मान्यवरांची उपस्थिती

प्रतिनिधी / खानापूर

आमदार अंजली निंबाळकर यांच्या अंजली निंबाळकर फाऊंडेशनच्यावतीने येथील मलप्रभा क्रीडांगणावर प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा गुऊवारी मोठ्या दिमाखात व उत्साहात पार पडला. भव्य अशा उभारलेल्या व्यासपीठावर आमदार अंजली निंबाळकर यांचे आगमन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आकर्षक अशा फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल, मानचिन्ह, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर शिवपुत्र महास्वामीजी, चन्नबसवरु स्वामीजी, मोहन महाराज बेळगाव, शिवपुत्र स्वामीजी, सिद्धेश्वर स्वामीजी, फादर नेल्सन पिंटो, मौलाना इम्तियाज यांची भाषणे झाली.

यावेळी आमदार अंजली निंबाळकर म्हणाल्या, निंबाळकर फाऊंडेशनच्यावतीने भव्य दिव्य अशा प्रो कबड्डी स्पर्धा आयोजित करताना राष्ट्रीय स्तरावरचे मैदान निर्माण करण्यात आले आहे. डिजीटल स्कोर बोर्ड व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. खेळाडूने हार जीत याचा विचार न करता आपल्या खेळाचे प्रदर्शन घडवावे. महिला संघाना प्राधान्य देण्यासाठी मी पुरूषाबरोबर महिला कबड्डी संघांच्या स्पर्धा आयोजित केल्या  आहेत, असे सांगितले. राष्ट्रगीत झाल्यानंतर आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते चापगाव विरुद्ध मनसापूर या महिला संघाच्या कबड्डी स्पर्धेचे नाणेफेक करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी हजारो प्रेक्षक या स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित होते.

40 पंचांची नियुक्ती

पुढील चार दिवस रोज रात्री या स्पर्धा होणार असून पाच हजार प्रेक्षक बसतील अशी प्रेक्षक गॅलरी निर्माण करण्यात आली आहे. तसेच वाहनांच्या पार्किंगचीही सुविधा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी 40 पंच नियुक्त करण्यात आले असून वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ही चोख  ठेवण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. या स्पर्धा शांततेत पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार अंजली निंबाळकर यांनी केले आहे.

Related Stories

फॅन्सी नंबर प्लेट ; दुचाकीस्वारांवर कारवाई

Amit Kulkarni

वैमानिक प्रशिक्षण केंद्राची लवकरच स्थापना

Amit Kulkarni

अमलझरीत बिरदेव यात्रा उत्साहात

Patil_p

कागवाड पोलिसांकडून 110 दुचाकी जप्त

Patil_p

स्मार्ट सिटीमुळे सहय़ादीनगरचा रस्ता अरुंद

Amit Kulkarni

काँग्रेस रोडवर पाणी साचल्याने निर्माण झाला स्वीमिंग पूल

Patil_p