Tarun Bharat

साईराज चषक क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक निमंत्रितांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे व्हॅक्सिन डेपो मैदानावरती उद्घाटन करण्यात आले. डेपो मैदानावरती या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुरस्कर्ते महेश फगरे, जगजंपी बजाजचे संचालक मल्लिकार्जुन जगजंपी, टिळकवाडी पोलीस स्थानकाचे सीपीआय दयानंद शिगोनाशी प्रविण हुंदरे, कुंडलिक फगरे, शितल वेसणे, वरदराज डेव्हलपरचे संचालक राजेश जाधव, गजानन फगरे, रोहित फगरे, राहूल फगरे, अमर सरदेसाई, विजय धामणेकर, वल्लभ कदम, अमर नाईक, सारंग राघोचे, नंदू मिरजकर, रमेश माईलगोल, सचिन हंगिरगेकर, राजेश लोहार, व्यंकटेश सरनोबत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन नारायण फगरे यांनी केले. दीपप्रज्वलन मल्लिकार्जुन जगजंपी व दयानंद शिगोनाशी यांच्या हस्ते करण्यात आले. महेश फगरे यांनी मैदानाचे पूजन केले. यष्टीचे पूजन विजय धामणेकर व अमर सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 40 संघांनी भाग घेतला आहे. अ गटात : धाद सखाल गोवा, मिनरा स्पोर्ट्स, स्टार इलेव्हन, डेपो मास्टर्स्, अक्षित स्पोर्ट्स, एवायएम अनगोळ, डिंगडाँग, ग्रामीण मराठा स्पोर्ट्स, एमसीसी मच्छे, मोहन मोरे. ब गटात : साईराज वॉरियर्स, इलेव्हन स्टार, सेव्हन स्टार, अयोध्या कडोली, युवराज स्पोर्ट्स, पांडुरंग सीसी मुन्नोळी, फँको लि., जगदंबा स्पोर्ट्स, एसएस इलेव्हन, एसआरएस  हिंदुस्थान. क गटात : सरकार स्पोर्ट्स गांधीनगर, साईराज बी, विराट स्पोर्ट्स, ब्रह्मलिंग स्पोर्ट्स, मराठा स्पोर्ट्स एसजे, स्वराज स्पोर्ट्स वडगाव, बलाजी स्पोर्ट्स हलगा, राजमुद्रा मंडोळी, मोईन बॉईज, एवायएम अनगोळ. ड गटात : विघ्नहर्ता अनगोळ, युनायटेड बालाजी स्पोर्ट्स, मराठा स्पोर्ट्स, एस राज स्पोर्ट्स कोवाड, एफएन इलेव्हन होसपेट, एमएच बॉईज सातारा, युवा स्पोर्ट्स, व्हीसीसी, वासुदेव स्पोर्ट्स, प्रथमेश मोरे आदी संघांचा समावेश आहे.

मंगळवारी पहिला प्रदर्शनीय सामना साईराज ए वि. साईराज बी यांच्यात सकाळी 10 वाजता होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना मिनरा स्पोर्ट्स वि. स्टार इलेव्हन, युनायटेड बालाजी स्पोर्ट् वि. मराठा स्पोर्ट्स यांच्यात खेळविण्यात येणार आहे.

Related Stories

निपाणी परिसराला पावसाने झोडपले

Patil_p

मच्छे थ्रोबॉल संघ जिल्हा स्पर्धेसाठी पात्र

Amit Kulkarni

सीमासत्याग्रही, रयत संघटनेचे नेते हरपले

Patil_p

‘मेसेज काही येईना, कॉलेजमध्ये प्रवेश मिळेना’

Amit Kulkarni

झाडे लावून पर्यावरणाचा ऱहास थांबवा

Patil_p

प्रवाशांच्या तपासणीसाठी जिल्हय़ात 23 चेकपोस्ट

Amit Kulkarni