ग्राहकांसाठी शाकाहारी-मांसाहारी मेजवानी
प्रतिनिधी /बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अलारवाड पुलाजवळ नूतनीकरण केलेल्या युवराज हॉटेलचे रविवारी थाटात उद्घाटन झाले. या फॅमिली हॉटेलचे उद्घाटन माजी महापौर मालोजी अष्टेकर व मान्यवरांच्या हस्ते फीत सोडून झाले. अध्यक्षस्थानी मराठा जागृती निर्माण संघाचे अध्यक्ष गोपाळराव बिर्जे होते. यावेळी ज्ये÷ पत्रकार प्रशांत बर्डे, प्रभाकर भाकोजी आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे जाधव कुटुंबीयांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सकाळी हॉटेलचे मालक युवराज जाधव व त्यांच्या पत्नी भारती जाधव यांच्या हस्ते लक्ष्मी पूजन झाले. या हॉटेलमध्ये बेळगाव, कोल्हापुरी, चायनीज, इंडियन तंदुरी, दम बिर्याणी यासारखे अनेक रुचकर पदार्थ ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शिवाय हॉटेलमध्ये पार्टी हॉलचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी मान्यवरांनी युवराज हॉटेल ग्राहकांच्या पसंतीला उतरेल, असा विश्वास व्यक्त केला. शिवाय राष्ट्रीय महामार्गाला लागूनच हॉटेल असल्याने ग्राहकांचाही ओढा वाढेल, अशी आशा व्यक्त केली. याप्रसंगी हॉटेलचे संचालक नेताजी जाधव, श्रीधर (बापू) जाधव, विजय जाधव, साईराज जाधव, सुमंत जाधव, डी. के. पाटील, वैजनाथ पाटील, पी. एस. गुरव यासह जाधव कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते. यावेळी जाधव कुटुंबीयांना उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.