जिल्हाधिकाऱयांसह विविध लोकप्रतिनिधींची उपस्थिती
प्रतिनिधी /बेळगाव
जगज्योती बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त शहरामध्ये उत्साहाचे वातावरण होते. जयंतीनिमित्त बसवेश्वर सर्कल येथील जगज्योती बसवेश्वर यांच्या पुतळय़ाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्यावतीने आणि विविध संघटनांच्यावतीने करण्यात आले. यावेळी अधिकाऱयांबरोबरच लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.
सकाळच्या सत्रामध्ये जगज्योती बसवेश्वर यांचे पूजन झाल्यानंतर सायंकाळी चित्ररथ देखाव्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. कोरोनामुळे दोन वर्षे साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली होती. मात्र यावषी कोरोना नियंत्रणात आल्यामुळे जयंती उत्साहाने साजरी झाली. परराज्यातील विविध वाद्ये तसेच ढोल-ताशा पथके याचबरोबर इतर कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते.
या नवीन ढोल-वाद्यांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली. कित्तूर चन्नम्मा चौक येथे चित्ररथ देखाव्यांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शहरातून ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, शंकरगौडा पाटील, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, नगरसेवक हणमंत कोंगाली, मुरगेंद्रगौडा पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.