Tarun Bharat

ग्रँड विटाराला मिळतोय प्रतिसाद, बुकिंगची संख्या 1 लाखावर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चारचाकी वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकीच्या नव्या अलीकडेच सादरीकरण झालेल्या ग्रँड विटाराला भक्कम प्रतिसाद लाभतो आहे. या गाडीकरीता बुकिंग करणाऱयांची संख्या 1 लाख 20 हजारपेक्षा जास्त झाली असल्याची माहिती कंपनीकडून नुकतीच देण्यात आली आहे.

10.45 लाख ते 19.65 लाख रुपये एक्सशोरूम किंमत असणाऱया ग्रँड विटारासाठी बुकिंगनंतर जवळपास 9 महिने वाट पाहावी लागते आहे. अर्थात यातील काही व्हेरियंटची डिलिव्हरी 2 महिन्यातही केली जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सुव्ह गटातील ही गाडी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सादर करण्यात आली होती. त्यावेळी बुकिंग खुले करण्यात आले होते. आजतागायत बुकिंग करणाऱयांची संख्या 1 लाख 20 हजारवर पोहचली आहे. याच दरम्यान ऑर्डर केल्यानंतर कंपनीने जवळपास 32 हजार गाडय़ा जानेवारी 2023 पर्यंत ग्राहकांना प्रत्यक्षात सुपूर्द केल्या असल्याचेही सांगितले जात आहे.

सप्टेंबर 2022 4,769

ऑक्टोबर 2022  8052

नोव्हेंबर 2022    4433

डिसेंबर 2022…. 6171

जानेवारी…… 8662

एकूण     32,087

Related Stories

नव्या होंडा झॅज कारचे प्री-बुकिंग सुरू

Patil_p

टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्सना प्रतिसाद

Patil_p

रेनॉच्या किगरला वाढती पसंदी

Amit Kulkarni

यामाहा मोटर्सने कमी केल्या किंमती

Amit Kulkarni

हिरोच्या एक्सपल्स-200 चे बुकिंग सुरु

Patil_p

इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रोत्साहनासाठी हिरो व जिओ-बीपी एकत्र

Patil_p